rojgar.jpg
rojgar.jpg 
उत्तर महाराष्ट्र

जेव्हा खंडित होतो वीजपुरवठा.. तेव्हाच "त्यांचे" सुगीचे दिवस!

संतोष घोडेराव

नाशिक : अंदरसुल येथे मोबाईल टॉवर, हॉस्पिटल, डीजे, दूध डेअरी यासारख्या विविध महत्वाच्या ठिकाणांबरोबर शेतकरी ही आपले पीक  वाचविण्यासाठी जनरेटर वापर करू लागल्याने नवनवीन जनरेटर खरेदी करण्याबरोबर जनरेटरच्या कारागिरांना ही सुगीचे दिवस आल्याने मान वाढला आहे. कोपरगाव, श्रीरामपूर, कोपरगाव, राहता या शहरामध्ये विनय मशनरी, आकाश मशनरी, न्यू आटो  यासारख्या दुकानांमध्ये जनरेटरची खरेदी करण्यासाठी दूरवरून नागरिक येत असतात.

लाखांची उलाढाल...

पाच केव्हीचे जनरेटर 28 हजार, दहा केव्हीचे 45 ते 65 हजार, तर 15 केव्हीच्या जनरेटरला 80 हजारापर्यन्त बाजारात असल्याने लाखांच्या घरात उलाढाल होते.ताशी अडीच ते तीन लिटर डिझेलचा खर्च येत असल्याने दहा केव्हीच्या जनरेटरला शेतकरी बांधव पसंती देत आहे.

कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन...

विशेषतः दहा केव्हीच्या जनरेटरवर पाच आणि तीन हॉर्स पॉवरची मोटर चालत असून ताशी अडीच ते तीन लिटर डिझेलचा खर्च येत असल्याने दहा केव्हीच्या जनरेटरला शेतकरी बांधव पसंती देत आहे. त्यामुळे जनरेटरच्या रूपानं खंडित वीज पुरवठ्यावर होणाऱ्या समस्या टाळल्या असून वेळेवर पिकाला पाणी देणे शक्य झाल्याने उत्पन्नात ही वाढ होतांना दिसून येत आहे. जनरेटर दुरुस्तीसाठी लिमिटेड कारागीर असल्याने जनरेटर दुरुस्तीसाठी  कारागिरांची शोधा शोध करून ही मिळत नसल्याने कारागिरांना ही सुगीचे दिवस आले असून या निमित्ताने हाताला रोजगार मिळाल्याने संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. 

जनरेटर दुरुस्तीसाठी लागणारा खर्च...

दहा केव्हीला दुरुस्तीसाठी साडेपाच हजार रुपये मोटर वाइंडिंगसाठी तर दोन हजार फीड वाइंडिंगसाठीला खर्च लागत असून कोपरगाव, राहता, येवला या ठिकाणी पेपर, स्वीप वारनीस, कॉटन टेप, साहित्य मिळत असून दुरुस्तीसाठी दोन दिवसांचा कालावधी लागतो. विशेष म्हणजे जनरेटर दुरुस्तीसाठी लिमिटेड कारागीर असल्याने जनरेटर दुरुस्तीसाठी कारागिरांची शोधा शोध करून ही मिळत नसल्याने कारागिरांना ही सुगीचे दिवस आले असून या निमित्ताने हाताला रोजगार मिळाल्याने संपूर्ण कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. 

जनरेटरचा महत्वपूर्ण वापर...

संपूर्ण जिल्ह्याभरात असलेले मोबाईल टॉवर, मोठ मोठे हॉस्पिटल आदी ठिकाणी ही आधुनिक आटो स्टार्ट जनरेटचा वापर केला जात असून मोठ्या दूध डेअरीमध्ये ही संकलन केलेले दूध फिल्टर व थंड करण्यासाठी जनरेटरचा महत्वपूर्ण वापर होतो. कांदा लागवडीच्या वेळी पिकाला वेळेवर पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी जनरेटर चा वापर करतात. 

प्रतिक्रिया...

कांदा लागवडीच्या वेळी पिकाला वेळेवर पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांनी जनरेटर चा वापर करतात. महिन्याला नऊ ,दहा जनरेटर दुरुस्तीसाठी येत असल्याने हाताला रोजगार मिळाला. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहसाठी हातभार लागला आहे. बाबासाहेब थोरात,जनरेटर कारागीर, अंदरसुल

वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या नेहमी असल्याने पिकाला वेळेवर पाणी देण्यासाठी आम्हाला जनरेटरचा वापर करावा लागतो. तर वेळेत पिकाला पाणी दिल्याने उत्पन्नात ही वाढ होते.
राजेंद्र सोनवणे, शेतकरी अंदरसुल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: आक्रमक खेळणाऱ्या रुसोचा शार्दुल ठाकूरने उडवला त्रिफळा; चेन्नईला मिळाली तिसरी विकेट

CSK vs PBKS: आजपर्यंत IPL मध्ये शिवम दुबेला असं बाद कोणी केलं नव्हतं, पाहा हरप्रीत ब्रारने चेन्नईला कसे दिले लागोपाठ दोन धक्के

Fact Check: बोगस मतदानासाठी पश्चिम बंगालमध्ये वाटली जात आहेत नकली बोटे? वाचा काय आहे सत्य

SCROLL FOR NEXT