nandgao
nandgao 
उत्तर महाराष्ट्र

नांदगाव : आदिवासींच्या वस्तीवर अखेर उजेड

सकाळवृत्तसेवा

नांदगाव : वर्षानुवर्षे अंधारात चाचपडत व उजेडापासून वंचित असलेल्या बोरताळेच्या आदिवासींच्या वस्तीवर अखेर उजेड पडला. स्वातंत्र्याच्या सत्तर वर्षानंतर कासारी गावाच्या पंचक्रोशीचा भाग असूनही नागरी सुविधांपासून वंचित असणाऱ्या या डोंगराळ वस्तीतल्या आदिवासींनी त्यासाठी प्रचंड पाठपुरावा केला होता.

नाशिक जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला मराठवाडा हद्दीतला हा भाग बहुतांशी वनविभागाच्या अखत्यारीत मोडतो. त्यामुळे वनजमिनीच्या मुद्द्यावर येथील संघर्ष करीत असलेल्या या आदिवासींना काही प्रमाणात त्या वनजमिनी मिळाल्या, खऱ्या मात्र नागरी सुविधांसाठी त्याची धडपड सुरूच होती त्यासाठी त्यांचा दीर्घकालीन लढा सुरूच होता. प्रसंगी बेमुदत उपोषणे केलीत. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील लढ्याला आमदार पंकज भुजबळ यांची साथ मिळाली या आदिवासींना वीज पुरवठा करण्यात यावा यासाठी आमदार पंकज भुजबळ यांनी जिल्हा नियोजन मंडळात त्यासाठीच्या सात लाख 51 हजर 197 रुपयाच्या खर्चाच्या प्रस्तावाला संमती मिळविली. त्यानुसार बाणगाव येथील वीज वितरण विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याने प्रस्ताव सादर केला. त्याला अंतिमतः मंजुरी मिळाली व काम सुरु झाले व हे काम येवला येथील रॉयल एन्टरप्रायजेस या मक्तेदाराला देण्यात आले.

मक्तेदाराने काम सुरु केले, त्याला सहकार्य म्हणून व वस्तीत उजेड येणार म्हणून आदिवासींनी स्वतः श्रमदान केले  मात्र गट नंबर 43 व 44 चा काही भाग वनविभागत मोडत असल्याने ठेकेदाराने आपले काम या सबबी खाली थांबविले. व  काम थांबले म्हणून आदिवासींनी पुन्हा आमदार भुजबळ, तहसीलदार,वीज वितरण असा पुन्हा पाठपुरावा सुरु केला. मात्र वन विभागाची अडचण आल्याचे सांगण्यात आल्याने वनविभागाकडे पाठपुरावा सुरु केला त्यात नाशिकच्या पूर्व विभागाचे वनसरंक्षक एस सीवावल यांनी गेल्या एप्रिल महिन्यात नियमानुसार परवानगी बहाल केली वनविभागाचा अडथळा दूर झाला. म्हणून सुखावलेल्या आदिवासींचा लगेचच अपेक्षाभंग झाला कारण ठेकेदाराला दिलेल्या कामाची मुदत संपल्याचा तांत्रिक मुद्दा उपस्थित करीत वीज वितरण विभागाने हे काम पुन्हा सुरु करण्यास नकार दिला होता.

शेवटी या लढाईला यश आले आज संतोष गुप्ता यांच्याच हस्ते वस्तीला मिळालेल्या ट्रान्सफॉर्मर्सचे उद्घाटन झाले. वस्तीवरच्या आदिवासी जनतेने आमदार पंकज भुजबळ यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करीत आपला आनंद साजरा केला. यावेळी वीज वितरणाचे सहाय्य्क कार्यकारी अभियंता मधुकर साळुंके, धर्मा सावंत, सतीश आहिरे, दत्तू पवार, राजेंद्र लाठे, राजेंद्र आहेर महेंद्र गायकवाड, लतीफ शेख, अरुण इप्पर, नाना जाधव, रमेश राठोड आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT