उत्तर महाराष्ट्र

शिक्षकाच्या लग्नात नेत्रदानाचा "आहेर'! 

सकाळन्यूजनेटवर्क

जळगाव ः भुसावळ येथील हिंदी सेवा मंडळ संचलित श्री. र. न. मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरातील उपशिक्षक अमित विजय चौधरी यांच्या विवाहात नवरदेव- नवरीसह बारा दात्यांनी नेत्रदानाचा संकल्प करीत "आहेर' दिला. 
लग्नातील पारंपरिक रूढी- परंपरांना फाटा देत उच्चशिक्षित असलेल्या वधू- वरांसह बारा जणांनी नेत्रदान करण्याचा संकल्प विवाहप्रसंगी केला. भुसावळ येथे झालेल्या विवाह सोहळ्यात सात फेरे घेऊन विवाहबद्ध झालेले वर अमित चौधरी हे उपशिक्षक आहेत; तर नववधू लीना पाटील ही कडगाव येथील असून, तिचे "एमबीए'चे शिक्षण झाले आहे. या वधू-वरांसह विजय चौधरी, वत्सला चौधरी, सुहास पाटील, संगीता पाटील, विद्या कोल्हे, हर्शल कोल्हे, हर्षा कोल्हे, विद्या कोल्हे, मुकेश कोल्हे, मीना कोल्हे आदींसह बारा जणांनी नेत्रदानाचा संकल्प केला. तसेच सर्व उपस्थित वऱ्हाडी मंडळींना स्वामी विवेकानंदांचे व्यक्तिमत्त्व विकास पुस्तक भेट देण्यात आले. यावेळी माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, डॉ. एन. एस. आर्विकर, गटशिक्षणाधिकारी विजय पवार, प्रा. शैलेश राणे, डॉ. जगदीश पाटील, हर्शल पाटील, पंकज पाटील, योगेश इंगळे, गणेश फेगडे, प्रसन्ना बोरोले, रवी पाटील, जीवन महाजन यांच्या हस्ते नेत्रदानाचा संकल्प अर्ज व प्रमाणपत्र या बारा दात्यांना प्रदान करण्यात आले. या विवाह सोहळ्यास सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे यांनीही उपस्थिती देत उपक्रमाचे कौतुक केले. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT