उत्तर महाराष्ट्र

कपाशीपेक्षा सूर्यफुलाची शेती किफायतशीर !

जगन्नाथ पाटील

कापडणे  : खानदेशात जळगाव, नंदुरबार जिल्ह्यांत सूर्यफुलाच्या शेतीस मोठी चालना मिळत आहे. धुळे जिल्ह्यात त्या प्रमाणात दुर्लक्ष होत आहे. धमाणे (ता. धुळे) येथील भगवान पाटील या शेतकऱ्याने सूर्यफूल शेतलागवडीवर भर दिला आहे. सात एकरमधून विक्रमी उत्पादन त्यांना अपेक्षित आहे. कापसाच्या शेतीपेक्षा सूर्यफुलाची शेती निश्चितच परवडणारी असल्याचा अनुभव पाटील यांनी व्यक्त केला. 


खानदेशात कापूस व कडधान्य यांना नगदी पिके म्हटले जाते. कापसाचे पीक शेतकऱ्यांना बऱ्यापैकी परवडणारे आहे. मात्र त्यास अधिक खर्चासह कष्टही अधिक घ्यावे लागतात. पाऊसही अधिक प्रमाणात अपेक्षित असतो. बागायती कापसाला पावसाचे सातत्य ठेवल्यामुळेच चांगल्यापैकी उत्पादन निघते. कापसाबरोबरच सूर्यफुलाचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. जळगाव व नंदुरबारपेक्षा कमी कल धुळे जिल्ह्यात पाहायला मिळतो. यासाठी कृषी विभागाने जागृती करणे अपेक्षित आहे. धमाणे येथील भगवान पाटील यांनी चक्क सात एकर क्षेत्रात सूर्यफुलाची लागवड केली आहे. त्यासाठी केवळ दोन हजार ४०० रुपयांचे बियाणे लागले. एकदाच फवारणी केली आहे. तीन महिन्यांत उत्पादन निघते. हमीभाव ५००० रुपये आहे. खुल्या बाजारात प्रतिक्विंटल सहा हजारांचा दर मिळत आहे. एकरी सात ते आठ क्विंटल उत्पादन अपेक्षित आहे. म्हणजेच कापसापेक्षा सूर्यफूल निश्चितच परवडणारे आहे, असेही पाटील यांनी सांगितले. 

दरम्यान, धुळे तालुक्यात मोजकेच शेतकरी सूर्यफुलाची शेती करीत आहेत. त्यास अद्यापही चालना मिळत नाही. कमी पाणी, कमी खर्च, कमी कालावधी व अधिक उत्पादन निघते. शेतकऱ्यांनी सूर्यफुलाची शेती करणे गरजेचे आहे. सूर्यफूल शेतीमुळे इतर क्षेत्रातील पिकांनाही त्याचा फायदा होतो. मधमाशांचे प्रमाण वाढते. पराग सिंचन वाढते. उत्पादनात वाढ होते. 

एरंडोल, जळगाव व धरणगाव बाजारात सूर्यफुलाला चांगली मागणी आहे. प्रतिक्विंटल पाच हजारांपेक्षा अधिक भाव मिळतोच. माझे हे पहिलेच वर्ष आहे. पण सूर्यफुलाची किफायतशीर शेती असल्याचा अनुभव येतोय. 
- भगवान पाटील, धमाणे, ता. धुळे 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT