farmer pachnama jalgaon
farmer pachnama jalgaon 
उत्तर महाराष्ट्र

साडेचार लाख हेक्‍टरवरील पंचनामे पूर्ण;  आज शेवटचा दिवस 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः जिल्ह्यात अवकाळी पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे आज अखेर 4 लाख 35 हजार 440 हेक्‍टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण केले आहेत. लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्यासाठी कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आली. 

जिल्ह्यात 24 ऑक्‍टोबरपासून विविध ठिकाणी अधिक प्रमाणात पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांनी काढून ठेवलेले ज्वारी, मका पिकांचे नुकसान झाले. ज्याठिकाणी कापूस फुटला होता तो संततधार पावसाने पूर्णतः काळा पडला. यासोबतच अनेक पिकांचे नुकसान झाले. यामुळे शेतकरी नुकसानीच्या खाईत ओढला गेला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर दिवाळीत व नंतरही पाऊस झाल्याने शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिवाळी साजरी करता आली नाही. 
यंदा चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना खरिपाचे उत्पादन अधिक होईल अशी आशा होती. मात्र ऑक्‍टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने आशेवर पाणी फिरले. कापूस शेतातच भिजल्याने बाजारात आणता आला नाही. यामुळे ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर संक्रांत आली. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून एकरी पंचवीस हजारांची मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत. 

तालुका निहाय झालेले पंचनामे 
अमळनेर-- 26 हजार 444 हेक्‍टर 
चोपडा--44 हजार 801 
एरंडोल-14 हजार 045 
धरणगाव-17 हजार 900 
पारोळा--33 हजार 70 
जळगाव--30 हजार 642 
भुसावळ--17 हजार 650 
बोदवड--6 हजार 348 
यावल--20 हजार 607 
रावेर--11 हजार 235 
मुक्ताईनगर--20 हजार 536 
भडगाव--23 हजार 948 
चाळीसगाव--58 हजार 470 
जामनेर--85 हजार 489 
पाचोरा--24 हजार 249 
एकूण--4 लाख 35 हजार 440 

जिल्ह्यात कृषी सेवक, तलाठी संबंधित कर्मचारी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात व्यस्त आहे. आतापर्यंत सुमारे साडेचार लाख हेक्‍टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. दहा नोव्हेंबरपर्यंत सर्व पंचनामे पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. 
-डॉ. नंदकुमार बेडसे, अप्पर जिल्हाधिकारी, जळगाव 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : कल्याणमधून श्रीकांत शिंदे अर्ज भरणार, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT