जिल्हा उपनिबंधक कार्यालयाबाहेर अंगावर रॉकेल ओतुन आत्मदहन करताना डिगंबर मराठे.
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाबाहेर अंगावर रॉकेल ओतुन आत्मदहन करताना डिगंबर मराठे. 
उत्तर महाराष्ट्र

सावकाराच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

सकाळवृत्तसेवा

जळगाव - सावकाराच्या छळाला कंटाळून उत्राण (ता. एरंडोल) येथील डिगंबर चिंधू मराठे या शेतकऱ्याने आज दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास जिल्हा उपनिबंधक कार्यालयासमोरच अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

मराठे यांनी मुलाच्या आजारावर उपचार करण्यासाठी सावकार अजय शालिग्राम बियाणी यांच्याकडून 2012 मध्ये साडेतीन लाखांचे कर्ज घेतले होते. दीड टक्का व्याजाचा दर ठरला होता. मात्र बियाणी याने शेतकरी मराठे यांची उत्राण गुजर हद्दीतील गट क्रमांक 314 मधील एक हेक्‍टर 13 आर. एवढी जमीन हडप केली. मराठे यांच्याकडे पाच वर्षांत सावकाराने 19 लाख 95 हजार कर्ज काढले. दीड टक्‍क्‍याने व्याज ठरले, तरीही त्याने व्याजावर व्याज लावून अवाच्या सव्वा व्याजाचा दर लावून वरील रक्‍कम काढली.

यामुळे मराठे यांनी 5 ऑगस्ट 2016 ला मुख्यमंत्र्यांकडे जाऊन तक्रार मांडली होती.

नंतर याच मागणीसाठी मराठेंसह अनेक शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते. त्या वेळी बियाणीवर गुन्हा दाखल करण्याचे आश्‍वासन दिले होते. तीन महिने उलटल्यावरही गुन्हा दाखल न झाल्याने मराठे यांनी जिल्हा उपनिबंधकांना काही दिवसांपूर्वी निवेदन देऊन 14 फेब्रुवारीपर्यंत गुन्हा दाखल न झाल्यास 15 फेब्रुवारीस आत्मदहन करेन, असे सांगितले होते. त्यानुसार आज त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: देशभक्तांमध्ये सर्वजण येतात... आरोप करणारे देशद्रोही; उद्धव ठाकरेंचा जोरदार पलटवार!

RSS: आता ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही 'नकली आरएसएस' म्हणतील; नड्डांच्या फुलटॉसवर, ठाकरेंचा षट्कार

PM मोदींच्या द्वेषयुक्त भाषणाच्या आरोपावर काय कारवाई केली? न्यायालयाचा पोलिसांना सवाल! ५ जूनपर्यंत मागवला अहवाल

भाजपला RSS ची गरज आहे का? जेपी नड्डांनी एका वाक्यात संपवला विषय, BJP मध्ये अंतर्गत राजकारण पेटणार

Latest Marathi News Live Update : आप खासदार राघव चढ्ढा दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT