उत्तर महाराष्ट्र

वह्या-पुस्तकांसाठी पैसे मागितले म्हणून मुलांनाच पाजले विष

सकाळ वृत्तसेवा

नाशिक - जन्मदात्रीनेच चिमुकलीला ठार केरल्याच्या दोन घटना गेल्या काही दिवसांत शहरात घडलेल्या असतानाच आता मद्यपी जन्मदात्यानेच आपला मुलगा व मुलीला बळजबरीने विषारी कीटकनाशक पाजून ठार करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शिंदेगावात घडली. या घटनेमध्ये संशयिताच्या मुलीने त्याच्याकडे शालेय वस्तू खरेदीसाठीचा आग्रह धरला होता. त्यातून मद्याच्या नशेत असलेल्या पित्यानेच असे कृत्य केले आहे. 

पंढरीनाथ बाबूराव बोराडे (वय 48, रा. माणिक चौक, शिंदेगाव, ता. नाशिक) असे संशयित बापाचे नाव आहे. शुक्रवारी (ता. 19) रात्री साडेदहाच्या सुमारास संशयित पंढरीनाथ बोराडे दारूच्या नशेमध्ये घरी आला. त्या वेळी संशयिताच्या बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने शालेय गणवेश आणि वह्या-पुस्तके खरेदी करण्यासाठी हजार रुपयांची मागणी केली. मुलांच्या शिक्षणालाच विरोध असलेल्या संशयित पंढरीनाथ यास त्याचा राग आला. त्याने तिला लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. तिला सोडविण्यासाठी आई व भाऊही धावले; परंतु त्यांनाही संशयिताने मारहाण केली. त्यानंतर संशयित घराबाहेर गेला आणि जनावरांच्या गोठ्यात ठेवलेले कीटकनाशकाची बाटली घेऊन परत घरात आला. त्याने पुन्हा निकिताला पकडून तिला रोगर पाजून तिला ठार करण्याचा प्रयत्न केला. तिला सोडविण्यासाठी 16 वर्षीय भाऊ धावला. त्या वेळी संशयिताने आपल्याच मुलाला पकडून त्याला खाली पाडले आणि त्याच्याही तोंडात रोगर ओतून ठार करण्याचा प्रयत्न केला. या वेळी संशयिताच्या पत्नीने आरडाओरडा करून शेजारच्यांना बोलविले. जमलेल्या लोकांनी संशयित मद्यपीला घराबाहेर नेले. तसेच मुलगा व मुलीस तत्काळ रिक्षातून बिटको रुग्णालयात उपचारासाठी आणले. प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी नाशिक रोड पोलिसांत संशयित जन्मदात्याविरोधात मुलांना ठार करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यास पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक के. एल. सोनोने तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT