Dhule Fire esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : लळिंग कुरणातील आग; 5 हेक्टरांवरील गवत खाक

सकाळ वृत्तसेवा

धुळे : लळिंग कुरण म्हणून प्रसिद्ध तिखी वनक्षेत्राच्या हद्दीत लागलेल्या आगीत पाच हेक्टरांवरील गवत जळून खाक झाले. शुक्रवारी (ता. २४) रात्री ही आग लागली होती. वन विभागाने दोन ब्लोअर व स्थानिकांच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली.

शनिवारी (ता. २५) वन अधिकाऱ्यांनी पाहणी केली. दरम्यान, आगीमुळे वन्यजीव होरपळे नसल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. आगीचे कारण स्पष्ट झाले नाही.

शहरापासून सुमारे नऊ किलोमीटरवर लळिंग (ता. धुळे) कुरण आहे. तिखी गावाला लागून वनक्षेत्र आहे. या ठिकाणी शुक्रवारी (ता. २४) रात्री आग लागली. आगीबाबत माहिती मिळाल्यावर वनाधिकारी संजय पाटील, वन परिक्षेत्र अधिकारी महेश पाटील व पथक घटनास्थळी दाखल झाले. वन विभागाला दोन वर्षांपूर्वी ९० ब्लोअर मशिन मिळाले आहेत.

हेही वाचा: नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

त्यांपैकी दोन ब्लोअरच्या मदतीने आग आटोक्यात आणली. त्यामुळे जीवितहानी टळली. ब्लोअर असल्यामुळे वणवा पसरला नाही. आग विझविण्यासाठी स्थानिक नागरिकांचीही मदत झाली. दरम्यान, या घटनेत पाच हेक्टरांवरील गवत जळून खाक झाल्याचे सांगण्यात येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubhanshu Shukla Return Video : हॅलो वर्ल्ड! अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परतल्यानंतरचा पहिला व्हिडिओ व्हायरल..

Shubhanshu Shukla: आईवडिलांच्या डोळ्यात पाणी, पंतप्रधानांना अभिमान...; शुभांशू शुक्ला पृथ्वीवर उतरताच प्रतिक्रिया काय होती?

Sangli Researcher : संशोधक घडत नसतो, घडवावा लागतो, सांगलीतील चहावाल्याचं पोरगं बनतंय टेक्नोलॉजी मास्टर; ड्रंक अँड ड्राईव्हला बसणार चाप

Nashik Kumbh Mela : महापालिकेचा टीडीआर प्लॅन; कुंभमेळ्यासाठी भूखंड ताब्यात घेण्याची तयारी

Mumbai Metro: मुंबईकरांचा प्रवास होणार आरामदायी! मेट्रो संख्येत होणार वाढ, किती मिनिटाला धावणार ट्रेन?

SCROLL FOR NEXT