eye.jpg 
उत्तर महाराष्ट्र

असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी : पराग माळी

प्रा.भगवान जगदाळे

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील खुडाणे (ता.साक्री) येथील संत सावता महाराज मंदिरात समता मेमोरियल फाउंडेशन (मुंबई), संत श्री. रणछोडदास आय हॉस्पिटल, वासदा (गुजरात) व खुडाणे ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सुमारे 100 गरजू रुग्णांची नुकतीच मोफत नेत्रतपासणी करण्यात आली.
 
त्यापैकी 25 रुग्णांवर वासदा (गुजरात) येथील संत श्री.रणछोडदास आय हॉस्पिटलमध्ये नेत्ररोगतज्ञांकडून मोफत मोतीबिंदू लेन्स शस्त्रक्रिया केली जाणार आहे. तसेच रुग्णांच्या येण्याजाण्याची, राहण्याची, चष्मा व औषधोपचाराची सर्व सोयही मोफत केली जाणार आहे. 'या जीवनात दृष्टीला खूपच महत्व असून असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी' असे प्रतिपादन सरपंच प्रतिनिधी पराग माळी यांनी यावेळी बोलताना केले.
  
नेत्रतपासणी शिबिराच्या उदघाटनप्रसंगी डॉ. दिपक गजबे, डॉ.प्रकाश गवळे, गणेश देवरे, सरपंच प्रतिनिधी पराग माळी, उपसरपंच नाना माळी, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र खैरनार, कन्हैयालाल काळे, अशोक खलाणे, विश्राम खैरनार, संजय गवळे, मनोज माळी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील सर्व तरूणांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PUC Fee Hike: वाहनचालकांना मोठा झटका! महाराष्ट्रात PUC तपासणीचे दर वाढले, आता किती पैसे मोजावे लागणार?

IND vs SL: रिषभ पंत अचानक मैदानातून का बाहेर गेला? रिटायर्ड हर्ट झाल्याने रवींद्र जडेजा मैदानात आला

Pune Crime: पुण्यात गुन्हेगारीचा थरार! मार्केट यार्डमध्ये तरुणाचा खून, बिबवेवाडीत तरुणावर जीवघेणा हल्ला

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, भरधाव येणाऱ्या स्कॉर्पिओचा टायर अचानक फुटला

Marathi News Live Updates : विडी उद्योजकांकडून महाराष्ट्र सोडूण्याचा इशारा, कारण काय?

SCROLL FOR NEXT