pune.jpg
pune.jpg 
उत्तर महाराष्ट्र

गॅस सिलिंडरच्या भीषण स्फोटात संसार जळून खाक

दीपक खैरनार

अंबासन, (जि.नाशिक) : बागलाण तालुक्यातील वायगाव येथे घरगुती गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन संसारोपयोगी वस्तूंसह कागदपत्र व रोकड जळुन खाक झाले. यात अंदाजे एक ते दीड लाखांचे नुकसान झाले आहे. कुटुंबिय मजुरी कामावर गेले असल्याने सुदैवाने या घटनेत जीवितहानी टळली. ही घटना सोमवारी (ता.११) सकाळी दहाच्या सुमारास घडली असून याबाबत महसूल विभागाने पंचनामा केला आहे.

 सविस्तर माहिती अशी की, वायगाव ते वडणेर रस्त्यावरील अंजनाबाई रघुनाथ पवार यांच्या मालकीच्या गट क्रमांक २५३/१ मध्ये असलेल्या झोपडीत सोमवारी (ता.११) सकाळी विधवा महिला अंजनाबाई या नेहमीप्रमाणे सकाळी स्वयंपाकाचे काम आटोपून शेजारील अन्य शेतकऱ्यांकडे मजुरी कामावर निघाल्या होत्या. काही वेळातच स्फोटाचा आवाज झाल्याने त्यांनी घराकडे पळ काढला. आरडाओरडा करून आसपासच्या नागरिकांना मदतीसाठी बोलावले. मात्र स्फोट इतका भयानक होता की, झोपडीचे चौघेही बाजूचे लोखंडी पत्रे फेकले गेले. स्फोट झाला त्यावेळी सुदैवाने घरात कोणीही नव्हते.

परिसरात पाणीटंचाई असल्याने अंजनाबाई यांचे दोन्ही मुले संदिप पवार व समाधान पवार रोजंदारीवर जात आहेत. गॅस सिलिंडरच्या झालेल्या स्फोटात घरातील गहू, बाजरीचे कोठार संसारोपयोगी वस्तू व रोकड जळुन खाक झाली आहे. तसेच पुतण्याच्या गाडीचे नवीन टायरही जळुन भस्मसात झाले आहे. सदर घटनेची माहिती पंचायत समिती सदस्य कान्हू आहिरे, माजी उपसरपंच अशोक आहिरे, केवळ आहिरे व सामाजिक कार्यकर्ते नितिन आहिरे यांनी घटनास्थळी भेट दिली, त्यांनी तात्काळ तलाठी, मंडल आधिकारी यांना सदर घटनेची माहिती दिली. मंडल आधिकारी दिपक धिवरे, तलाठी सचिन गायकवाड यांनी भेट देऊन पंचनामा केला. अचानक झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात आजमितीस पवार कुटुंबिय उघड्यावर आले आहे. संबंधित गॅस वितरकानेही भेट दिली असून वरीष्ठ कार्यालयात माहिती कळविण्यात आल्याचे सांगितले.

''पवार कुटुंबियांचे अचानक झालेल्या गॅस सिलिंडरच्या स्फोटात अतोनात नुकसान झाले आहे. गॅस कंपनीने गांभीर्याने लक्ष घालून लवकरात लवकर या गरीब कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी.''
-  अशोक आहिरे, माजी उपसरपंच वायगाव.

''मी कामले जायेल व्हतू, मागे गॅस सिलिंडरना स्फोट व्हई गया. यानामा घरातलं सगळं सामान जळीन खाक व्हई गयं, कसानाच आधार राहिना नही राहिना.
- अंजनाबाई पवार, वायगाव.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Pakistan Team coach : मोठी बातमी! भारताला World Cup मिळवून देणारा गुरू बनला पाकिस्तानचा कोच, PCB ने दिले अपडेट

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : अभिनेता साहिल खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT