yeola
yeola 
उत्तर महाराष्ट्र

जिल्हा बँकेच्या सक्तीच्या कर्जवसुलीसह लिलाव थांबविण्याच्या सूचना 

सकाळवृत्तसेवा

येवला : नाशिक जिल्हा बँकेमार्फत शेतकऱ्यांची थकित कर्जवसुली सक्तीने सुरु आहे. आजच वर्तमानपत्रात मी नोटीसा पहिल्या असून दुष्काळ असल्याने हि वसुली अयोग्य आहे.आज सकाळीच मी जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांच्याशी चर्चा केली असून येत्या दोन दिवसात दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या जमिनीचे जाहीर लिलाव व वसुली स्थगित केली जातील असे आश्वासन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांशी बोलताना दिले.

देशमाने, जळगाव नेऊर,येवला,सावरगाव, चांदगाव, नायगव्हान, नगरसुल, राजापूर या गावात भेटी देत शेतकरी व सर्व सामान्य जनतेशी संपर्क साधत त्यांनी संवाद साधला.यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शितल सांगळे, डॉ.भारती पवार,पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पवार,दादा जाधव,डॉ.आत्माराम कुंभार्डे आदी दौऱ्यात सहभागी होते.

शेतकऱ्यांचे विविध शासकीय व कांदा अनुदान मिळाले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली.यावर महाजन यांनी आठ दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये सर्व अनुदाने वर्ग केले जातील अशी ग्वाही दिली. मांजरपाडाच्या बोगद्याचे प्रलंबित काम चांदवड व येवला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सुरू केले जाईल, तालुक्यात जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा छावण्या व पिण्याच्या पाण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील असे महाजन म्हणाले. गावांमध्ये मजुरांना काम हवे असतील त्या ठिकाणी रोजगार हमी योजना यासह शासनाच्या विविध योजनेअंतर्गत कामे करण्यासाठी ग्रामपंचायतीकडे मजूरांनी कामाची यादी द्यावी त्यांना त्वरित कामे उपलब्ध करुन दिले जातील असेही ते यावेळी म्हणाले.

महाजन यांनी जळगाव नेऊर येथे ग्रामपंचायत कार्यालयात शेतकरी व ग्रामस्थांशी दुष्काळाचा सामना देताना येणाऱ्या अडचणींविषयी चर्चा केली. नगरसुल व राजापूर येथे शेतकऱ्यांशी संवाद साधत दुष्काळाला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी,जि.प.सदस्य सविता पवार, सभापती कविता आठशेरे, शिवसेना तालुकाप्रमुख रतन बोरनारे,शरद लहरे, दिलीप मेंगळ, विठ्ठल आठशेरे, भाजपाचे नगरसेवक प्रमोद सस्कर,शहराध्यक्ष आनद शिंदे, तालुकाध्यक्ष राजू परदेशी, नाना लहरे, समीर समदडीया, नगरसुलचे सरपंच प्रसाद पाटील, मनोज दिवटे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT