Jalgaon-Municipal
Jalgaon-Municipal 
उत्तर महाराष्ट्र

मुली असल्यास घरपट्टीत मालमत्ताधारकाला सूट

सकाळवृत्तसेवा

जळगाव - महापालिकेचा २०१८ -१९ या आर्थिक वर्षासाठीच्या मूळ अंदाजपत्रकात स्थायी समिती सभापतींनी दुरुस्ती केल्याने आता हे अंदाजपत्रक १ हजार २१७ कोटी ४६ लाख ३४ हजार रुपयांचे झाले. यात विविध विषयांच्या तरतुदीत ४० कोटींची वाढ केली आहे, तर स्थायी सभेत सदस्य ॲड. शुचिता हाडा यांनी सुधारित तरतुदींमध्ये मालमत्ताधारकास १ किंवा २ मुली असतील तर त्याला घरपट्टीत एक टक्का सूट देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. 

महापालिका आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी बुधवारी (ता. २०) विशेष स्थायी समिती सभेत २०१९-२० साठी १ हजार ११७ कोटी ४६ लाख ३४ हजार रुपयांचे कुठलीही करवाढ नसलेले अंदाजपत्रक सादर केले होते. हे अंदाजपत्रक २४७ कोटी ५१ लाख ४२ हजार शिलकीचे अंदाजपत्रक होते. त्यानंतर अभ्यास करण्यासाठी ‘स्थायी’ची सभा तहकूब करण्यात आली होती. ही तहकूब सभा घेण्यात आली.   

‘स्थायी’त २०१९-२० अंदाजपत्रकास मंजुरी देण्यासाठी आज सायंकाळी चारला ही सभा स्थायी समितीचे सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. व्यासपीठावर उपायुक्त चंद्रकांत खोसे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, नगरसचिव सुनील गोराणे उपस्थित होते. यावेळी यात सभापती मराठे यांनी अंदाजपत्रक सादर केले. त्यास समितीने मान्यता दिली. 

...तर एक टक्का सूट 
‘स्थायी’च्या सभेत अंदाजपत्रकातील तरतुदी मांडताना ॲड. सुचिता हाडा यांनी ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या उपक्रमांतर्गत सूचना मांडली. यात ज्या मिळकतधारकांना एक किंवा दोन मुली आहे. अशांना घरपट्टीत एक टक्का सूट देण्याची सूचना मांडली केली. 

अंदाजपत्रक बाराशे कोटींचे
प्रशासनाकडून आयुक्तांनी १ हजार ११७ कोटी ४६ लाख ३४ हजार रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले होते. यात मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या १०० कोटी रुपयांच्या निधीचा उल्लेख नव्हता. त्या निधीचा समावेश जमा बाजूत तसेच खर्च बाजूत स्थायी सभापतींनी केला आहे. त्यामुळे अंदाजपत्रक आता १ हजार २१७ कोटी ४६ लाख ३४ हजार रुपयांचे झाले आहे. 

थकबाकीबाबत आक्षेप
घरपट्टीची रक्कम थकबाकी ४० कोटी व आगामी वर्षाची मागणी ४० कोटी अशी अंदाजपत्रकात ८० कोटी अपेक्षित होती. मात्र, प्रशासनाने केवळ ४० कोटी इतकीच रक्कम उत्पन्नामध्ये दर्शविली आहे. तसेच तसेच महापालिका मिळकत इमारतींपासून मिळणारे उत्पन्न यात मुदत संपलेल्या गाळ्यांचे भाडे केवळ १२४ कोटी दर्शविण्यात आले आहे. मात्र गाळेधारकांना सुमारे २९६ कोटी रुपयांची बिले आतापर्यंत बजावली आहेत. त्यामुळे ही रक्कम देखील कमी दर्शविल्याबाबत शिवसेनेचे सदस्य नितीन लढ्ढा यांनी आक्षेप घेतला. 

पथदिव्यांसाठी ७ कोटी
महामार्ग चौपदरीकरण होताना त्यामधील दुभाजकांमध्ये पथदिवे लावण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. त्यासाठी निधीची तरतूद करावी, अशी मागणी केली. त्यानुसार सभापती जितेंद्र मराठी यांनी यासाठी ७ कोटी रुपये, तसेच शहरातील भूजलपातळीत वाढ व्हावी, यासाठी शहराबाहेर अविकसित जागेत ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ यासाठी २ कोटी रुपयांची तरतूद, प्रति दीक्षाभूमीसाठी २ कोटी रुपये देण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. 

..तर बैलगाड्या महापालिकेत आणणार - खडके
शिवाजीनगर पूल तोडण्यापूर्वी महिनाभरापासून महापालिका प्रशासनाला ममुराबाद-आसोदा रस्ता दुरुस्तीची मागणी केली होती. बैलगाड्यांना पर्यायी रस्ता नसल्याने दोन सभेत मागणी केली होती. हा विषय मार्गी लागत नसल्यास अखेर आज ‘स्थायी’च्या सभेत भाजप सदस्य सुनील खडके यांनी प्रश्‍न मांडला. जर आता हा प्रश्‍न सोडविला नाही तर शेतकऱ्यांना बैलगाड्यांसह महापालिकेत आणून एकाही अधिकाऱ्याला इमारतीत जाऊ देणार नाही, असा इशारा सुनील खडके यांनी दिला आहे. यावर सभापती मराठे यांनी उद्या या रस्त्याची पाहणी करू, असे आश्‍वासन दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT