Beating News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : ग्रामपंचायत विस्ताराधिकारी जगदीश खाडे यांना मारहाण

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : येथील पंचायत समितीच्या ग्रामपंचायत विभागातील विस्तार अधिकारी जगदीश पांडुरंग खाडे यांना आज दुपारी एकच्या सुमारास पंचायत समिती कार्यालयात सहाय्यक गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनातच प्रवीण मुरलीधर बोरसे (रा. कावठे, ता. साक्री) यांनी मारहाण केली. (Gram Panchayat Extension Officer Jagdish Khade beaten dhule crime news)

या प्रकरणी मारहाण तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी प्रवीण बोरसे यास ताब्यात घेतले आहे.

नागपूर (व, ता. साक्री) येथील ग्रामपंचायत शिपाई अनिल बिरारीस यास कामावर हजर करून घ्या, असे सांगत, धमकावत शिवीगाळ करून श्री. खाडे यांना मारहाण करण्यात आली. दुपारी एकच्या सुमारास सहाय्यक गटविकास अधिकारी भगवान पाटील यांनी श्री. खाडे यांना त्यांच्या दालनात बोलवले असता या वेळी प्रवीण बोरसे हाही त्या ठिकाणी उपस्थित होता.

श्री. बोरसे हे नागपूर (व) ग्रामपंचायत येथे शिपाई पदावर नेमणुकीस असलेल्या अनिल बिरारीस यांच्या निलंबनाबाबत विचारणा करीत त्यांना कामावर हजर करून घ्या, असे सांगत धमकावत होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

श्री. खाडे यांनी सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे सांगत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र श्री. बोरसे यांनी संतापात उठून शर्ट कॉलर पकडून शिवीगाळ करीत त्यांना बुक्क्यांनी मारहाण करीत शासकीय कामात अडथळा आणला.

तसेच, मी सामाजिक कार्यकर्ता असून, तुमची नोकरी खाऊन जाईल, तुम्हाला निलंबित करेल, अशा शब्दांत धमकावल्याचे या तक्रारीत श्री. खाडे यांनी नमूद केले आहे. या वेळी सहाय्यक गटविकास अधिकारी पाटील, विस्तार अधिकारी अमृत महाले, दीपक सुर्वे आदींनी मध्यस्थी करीत श्री. खाडे यांना श्री. बोरसे यांच्यापासून सोडविले. यानंतर श्री. खाडे यांनी पोलिस ठाण्यात प्रवीण बोरसे याच्याविरोधात फिर्याद दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT