crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Bribe News : साडेसहा लाखांची लाच घेताना ग्रामसेवकास रंगेहाथ पकडले

ग्रामसेवक मनोज पावरा (रा. दामोदरनगर, तळोदा) यास सहा लाख ४७ हजार रुपयांची लाच घेताना नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून गुन्हा दाखल केला.

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : गावातील विकासकामांचे बिल अदा करण्यासाठी अक्कलकुवा पंचायत समितींतर्गत असलेल्या ग्रामसेवक मनोज पावरा (रा. दामोदरनगर, तळोदा) यास सहा लाख ४७ हजार रुपयांची लाच घेताना नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून गुन्हा दाखल केला.

ग्रामसेवकास बुधवारी (ता. ७) तळोदा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. (Gram Sevak was caught red handed while accepting bribe of six and half lakh nandurbar bribe news)

तक्रारदाराची पत्नी ग्रामपंचायत सिंदुरी (ता. अक्कलकुवा) येथे सरपंच होती. यानंतर ग्रामपंचायतीवर शासनाचे प्रशासक कार्यरत होते. या काळात ग्रामपंचायत सिंदुरी अंतर्गत मंजूर रस्ता काँक्रिटीकरण, पेव्हर ब्लॉक बसविणे अशी विविध आठ प्रकारची मंजूर विकासकामे तक्रारदार व त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी पूर्ण केली आहेत.

नमूद कामे पूर्ण झाल्यावर कामांबाबतचे बिल ३२ लाख ३४ हजार रुपये ग्रामपंचायत सिंदुरीच्या बँक खात्यात शासनाकडून आले आहे. मात्र, नमूद कामांच्या बिलाचे धनादेश देण्याच्या मोबदल्यात आरोपी ग्रामसेवक व खासगी व्यक्ती यांनी बिलाच्या रकमेच्या २० टक्के रक्कम म्हणजे सहा लाख ४७ हजार रुपये लाचेची मागणी करीत रक्कम पंच व साक्षीदारांसमक्ष स्वीकारली.

यामुळे गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी, कार्यवाही पथक पोलिस हवालदार विलास पाटील, देवराम गावित, पोलिस नाईक संदीप नावाडेकर, नरेंद्र पाटील, सुभाष पावरा, संदीप खंदारे, हेमंत महाले.

जितेंद्र महाले तसेच सापळा मदत पथक पोलिस निरीक्षक समाधान वाघ, माधवी वाघ, नाईक विजय ठाकरे यांच्या पथकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधीक्षक माधव रेड्डी, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT