gujrat cheak post close 
उत्तर महाराष्ट्र

गुजरातमधील 16 चेकपोस्ट बंद होणार 

प्रा. डी. सी. पाटील

शहादा : आरटीओ चेकपोस्टवर होत असलेला गैरप्रकार लक्षात घेऊन गुजरात शासनाने राज्यातील 16 चेकपोस्ट 20नोव्हेंबर पासून कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील चेकपोस्ट तर भ्रष्टाचाराचे आगार असल्याची ओरड सर्रास होत असल्याने राज्यातील ही चेकपोस्ट बंद करण्याचे धारिष्ट्य शासन दाखवेल का असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

दरम्यान चेकपोस्ट हटविल्यानंतर, कोणतेही अतिरिक्त भार असलेले वाहन किंवा नियमांचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले किंवा कर आकारणी बाकी असल्यास दंड किंवा कराची रक्कम थेट वाहन मालकांना दिली जाईल व त्यांच्या खात्यातून परस्पर वजा केले जाईल. त्यामुळे चेकपोस्टवर होणाऱ्या वाहनांच्या रांगा बंद होण्यासह लाखो लिटर इंधनाचे बचत होणार आहे. 

गुजरात राज्यात प्रादेशिक आरटीओ विभागाच्या 16 चेकपोस्ट आहेत. सदरचे चेकपोस्ट रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. येत्या 20 नोव्हेंबरपासून राज्यातील सर्व चेकपोस्ट बंद होतील. त्यानंतर वाहन चालकांना चेकपोस्टवर उभे रहावे लागणार नाही. यातून इंधनाचीही बचत होईल. यापुढे चेकपोस्टवर कोणत्याही प्रकारचा गैरवर्तन किंवा जड वाहनांचा दंड ऑनलाइन गोळा केला जाईल. याचा अर्थ थेट मालकाच्या खात्यातून ऑनलाईनने रक्कम कपात केली जाईल. 

चेकपोस्टवरील गैरप्रकारांमुळे निर्णय 
राज्यातील वेगवेगळ्या आरटीओ चेकपोस्टवर गैरप्रकार व मोठ्या प्रमाणात कर्मचारी वाटपामुळे वाहन विभागाने चेकपोस्टचे निर्मूलन व दंड वसूल करण्याची व्यवस्था ऑनलाइन केली आहे. 
चेकपोस्टवर तैनात कर्मचारी आणि त्यांच्या नेमणुकां संदर्भात गैरवर्तनाच्या तक्रारी होत्या. चेकपोस्टवर तपासणी केल्यावरही बर्याचदा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. त्या दरम्यान इंधनही वाया जाते. राज्यातील सर्व 16चौक्‍या 24 तास कार्यरत असल्याने या कार्यालयांना मोठ्या संख्येने कर्मचारी तैनात करावे लागले होते. 

चेकपोस्ट कर्मचाऱ्यांचे समायोजन 
सध्या चेकपोस्टवर काम करणार्या कर्मचाऱ्यांपैकी प्रामाणिक कर्मचाऱ्यांना फ्लाईंग स्क्वाडमध्ये ठेवण्यात येईल. तर इतर कर्मचाऱ्यांना इतर कार्यालयात पोस्टिंग केली जाईल. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pandit Deshmukh Murder Case: कोण होते पंडित कमलाकर देशमुख, कशी झाली होती हत्या? सोलापूर हादरवणारी Exclusive माहिती

Hasan Mushrif Kagal : हसन मुश्रीफांच्या मनातलं आलं ओठावर, समरजित घाटगेंसोबत मनोमिलन करणाऱ्या अदृश्य शक्तीचं नाव केलं उघड; मंडलिकांवरही म्हणाले...

Credit Card Offer: लाइफटाइम फ्री क्रेडिट कार्ड ऑफर! कमी क्रेडिट स्कोअर असला तरीही चालेल! काय आहे ही नवी ऑफर?

Latest Marathi News Live Update : कृषिमंत्री दत्तामामा भरणे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर

आजारी पत्नीवर जादूटोणा करण्याचा प्रकार उघड! 'शेतात चाललं होतं भयानक कांड'; संगमनेर तालुक्यातील धक्कादायक घटना समोर..

SCROLL FOR NEXT