Tehsildar Dr. while singing in a professional manner. Milind Kulkarni esakal
उत्तर महाराष्ट्र

'हर घर तिरंगा,...'; तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांची गाण्यातून जनजागृती

कमलेश पटेल

शहादा (जि. नंदुरबार) : ‘हर घर तिरंगा, लहरायेगा प्यारा, है शान हमारी, भारत हमारा, है जान हमारी’ या गीतातून स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी, घरोघरी राबविण्यात येत असलेल्या तिरंगा मोहिमेस बळकटी मिळावी यासाठी शहाद्याचे तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी हर घर तिरंगा हे गीत स्वरबद्ध केले असून, गायिले आहे. (Har Ghar Tiranga Tehsildar Dr Milind Kulkarni Public awareness through song nandurbar latest Marathi news)

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे गीत तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी जनमानसात जनजागृती, देशाप्रति आदरभाव जागृत व्हावा यासाठी स्वतः तयार केले असून, गायक, गीतकार, संगीतकार ते स्वतः आहेत.

संगीत संयोजन अनिल धुमाळ यांनी, ध्वनी मिश्रण जगदीश भांडगे, तर गीताचे ध्वनिमुद्रण ॲपोस्ट्रॉफी स्टुडिओ नाशिक यांनी केले आहे. महसूल विभागाची नोकरी म्हटली म्हणजे ऑन ड्यूटी २४ तास. मात्र त्यातूनही वेळ काढत डॉ. कुलकर्णी यांनी आपल्या छंदात नियमितता ठेवली आहे. नोकरी करीत असताना विभागात आलेले अनुभव त्यांनी अनेकदा गीतातून व्यक्त केले आहेत.

याआधीही पूरस्थिती, भूस्खलन, नैसर्गिक आपत्ती, कोरोना यांसारख्या विविध संकटातून माणसाची वाटचाल सुरू असताना त्यांच्या पंखांना बळ मिळावे, जगण्याची जिद्द प्राप्त व्हावी यासाठी दुःख न करता नव्या दमाने ‘चाल पुढे तू सामर्थ्याने आपत्तीग्रस्तांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी’ हे गीत रचले होते.

त्याचबरोबर शासनाच्या उभारी योजनेच्या स्पर्श देत पानी बीना आयी फसले, फसलो पे फेर गया पाणी या गीतातून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना सोसावे लागणाऱ्या व्यथा गाण्यातून मांडल्या होत्या.

आता देशाप्रति आदरभाव जागवत हर घर तिरंगा हे गीत त्यांनी मांडले आहे. यासाठी त्यांना जिल्हाधिकारी मनीषा खत्री, प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे यांसह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. या गीतातून देशाच्या राष्ट्रध्वज तिरंगा या तिरंग्यातील तिन्ही रंगांचे त्याचबरोबर अशोक चक्राचे महत्त्व विशद करताना त्यातून मिळणारी शिकवण गीतातून वर्णिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

करदात्यांसाठी गूडन्यूज! ITR दाखल करण्यासाठी १ दिवस मुदतवाढ, मध्यरात्री निर्णय; आजच भरा

Solapur Rain : कोरड्याठक सीना नदीला २५ वर्षांत पहिल्यांदाच भयंकर पूर, १० गावे पाण्याखाली, हजारो नागरिकांचा संपर्क तुटला

Maharashtra Weather Updates : राज्यात परतीच्या पावसाचा धुमाकूळ, आजही मुंबई-पुणे, मराठवाड्याला धोक्याचा इशारा

Pune Heavy Rain: सहा तालुक्यांत अतिवृष्टी; १७ धरणांतून पाणी सोडले, दौंडमध्ये ढगफुटी

Ujani Dam:'भीमा नदीला तीन महिन्यांत तिसऱ्यांदा पूर'; उजनीतून पाच वर्षांनंतर यंदा सोडले १५२ टीएमसी पाणी, ९० हजार क्युसेकचा विसर्ग

SCROLL FOR NEXT