Have spoken to PM Narendra Modi about Drought situation in Maharashtra, says Devendra Fadnavis
Have spoken to PM Narendra Modi about Drought situation in Maharashtra, says Devendra Fadnavis 
उत्तर महाराष्ट्र

दुष्काळाच्या मदतीबाबत पंतप्रधानांशी चर्चा : मुख्यमंत्री फडणवीस

सकाळवृत्तसेवा

धुळे : राज्यातील दुष्काळाचा अहवाल केंद्र शासनाकडे पाठवण्यात आला आहे. राज्याला आवश्‍यक निधी मिळावा यासाठी पंतप्रधानांशी बोलणे झाले आहे, लवकरच निधी उपलब्ध होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.

जिल्ह्याची आढावा आणि कायदा सुव्यवस्थेसंदर्भात आढावा बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पर्यटन मंत्री जयकुमार रावल, पालकमंत्री दादा भुसे उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ''राज्यात दुष्काळ आहे. त्याबाबत आपला अहवाल केंद्र शासनाला देण्यात आला आहे. केंद्रीय पथकाने पाहणी केली आहे. राज्याला दुष्काळ निवारण्यास मदत मिळावी, यासाठी आपली पंतप्रधानांशी चर्चा झाली आहे. तेथून लवकरच निधी उपलब्ध होईल. त्याचा शेतकऱ्यांना अपेक्षित लाभ होईल.'' 

फडणवीस म्हणाले, ''जिल्ह्यातील विविध जलप्रकल्पात केवळ 37 टक्के जलसाठा आहे. जिल्ह्यात 405 गावात टंचाई आहे, तेथे 646 उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. चाऱ्याची कमतरता भासणार नाही अशी स्थिती आहे. गरज भासली तर चारा उपलब्ध करण्याची तयारी आहे.''

फडणवीस म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सर्व प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार आहे. झोपडपट्टी मालकीहक्काबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थी शिष्यवृत्ती योजनेसाठी (डीबीटी) ऑनलाईन माहिती आणि पैसे ऑनलाईन देणे बंधनकारक आहे. काही संस्था त्यात माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्या मुलांचे नुकसान होऊ नये म्हणून संस्थांनी माहिती द्यावी. अन्यथा मुलांचे नुकसान झाले तर त्या संस्थेस जबाबदार धरण्यात येईल.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : भाजपचे दिल्ली तख्त ‘महाराष्ट्र’च खेचणार : उद्धव ठाकरे

Dushyant Chautala: "...तर सरकार पाडण्यास मदत करू," माजी उपमुख्यमंत्र्याने काँग्रेसला पाठिंबा देत वाढवले भाजपचे टेन्शन

"मी माझ्या मुली घेऊन चालले..."; व्हिडिओ पोस्ट करत विवाहितेने जीवन संपवलं, दोन मुलींना दिलं विष

Sam Pitroda: ईशान्य भारतीय चिनी, तर दक्षिणेतील लोक आफ्रिकन लोकांप्रमाणे दिसतात; पित्रोदांच्या वक्तव्याने वादाची शक्यता

Latest Marathi News Live Update : मतदान कमी झाल्याची चिंता नाही - अजित पवार

SCROLL FOR NEXT