help-to-flood-survivors
help-to-flood-survivors 
उत्तर महाराष्ट्र

पूरग्रस्तांना अकरा लाख रुपयांच्या साहित्याची थेट मदत

सकाळ वृत्तसेवा

सटाणा : येथील 'स्वराज्य प्रतिष्ठाण कसमादे' तर्फे कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांना अकरा लाख रुपयांच्या कौटुंबिक साहित्यासह विविध जीवनावश्यक गोष्टींची मदत एका ट्रकद्वारे थेट पोहीचविण्यात आली. सटाण्यातून 'आम्ही बागलाणकर' या नावाने मदतीच्या साहित्याचा ट्रक स्वयंसेवकांसह पूरग्रस्त भागात रवाना झाला होता. 

नाशिक जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष, प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक राहुल पाटील यांनी 'एक हात मदतीचा' या उपक्रमाद्वारे केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत सटाणा शहर आणि कसमादे परिसरातील आबालवृद्धांपासून विविध समाजघटकांनी आपली मदत प्रतिष्ठाणकडे सुपूर्द केली होती. कोल्हापूरचे पोलिस निरीक्षक अविनाश कुऱ्हाडे यांच्या सहकार्याने नगरसेवक पाटील यांनी स्वयंसेवकांसोबत मदतीपासून वंचित असलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांच्या सीमेवरील दानवाड आणि दत्तवाड (ता.शिरोळ जि.कोल्हापूर) या दोन्ही गावांमधील ५५० पूरग्रस्त कुटुंबीयांपर्यंत थेट मदत पोहोचवली. आवश्यक मदत मिळाल्याने पूरग्रस्त जनतेच्या चेहऱ्यावर समाधान पसरले होते. पुरग्रस्तांसाठी सटाणा शहर व कसमादे परिसरातून १ टन तांदूळ, सहाशे किलो गव्हाचे पीठ, पंचवीस घरांसाठी किराणा, दोनशे चहा पावडर पुडे, तीनशे सॅनिटरी नॅपकिन्स, यांसह अनेक वस्तूंची मदत स्वराज्य प्रतिष्ठाणकडे संकलित झाली होती. 

प्रतिष्ठाणच्या स्वयंसेवकांमध्ये दत्तू बैताडे, आशिष देवरे, ओम सोनवणे आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT