उत्तर महाराष्ट्र

पतीचा संतापी स्वभाव ॲड. विद्या यांच्या जिवावर

सकाळवृत्तसेवा

जळगाव/जामनेर - ॲड. विद्या राजूपत यांच्या हत्येने जामनेरच नव्हे तर जळगावातील कायदे वर्तुळही हादरले. स्वत: त्या शांत, मनमिळाऊ स्वभावाच्या तर पती डॉ. भरत नेमके विरोधी शीघ्रकोपी व संशयी वृत्तीचे होते. क्षणात संताप येऊन ते काहीही करत, अशी माहिती समोर आली आहे. त्यातूनच वाद वाढत जाऊन भरत यांनी थेट विद्या यांची हत्या करण्यापर्यंत टोकाचे पाऊल उचलले.

मूळ बेलखेडे (ता. भुसावळ) येथील रहिवासी डॉ. भरत पाटील आणि ॲड. विद्या राजपूत यांचा विवाह झाल्यानंतर वर्षांपूर्वीच ते जामनेरच्या सुपारीबाग येथे राहण्यास आले होते. पाटील दाम्पत्यास दुर्गेश (वय १४) आणि नमीत (वय ९) अशी दोन मुले. मोठा मुलगा बुलडाणा येथे शिक्षणासाठी वास्तव्याला आहे. रविवारी रात्री पती-पत्नी नेहमीप्रमाणे घरी असल्याचे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. रात्री घटनेनंतर डॉ. भरतने विद्या यांचा मृतदेह घेत बेलखेडे (ता. भुसावळ) मूळ गाव गाठले. पहाटे त्यांच्या माहेरी धुळे येथे माहिती कळविल्यावर परस्पर अंत्यविधीचा निर्णय देखील घेण्यात आला होता. त्यामुळे जामनेरला कुणालाही या घटनेची साधी माहितीही कळाली नाही. या घटनेनंतर आता जामनेर पोलिसांनी डॉ. भरत यांचे सुपारीबागेतील निवासस्थान सील केले असून, भरत पाटलांना अटक केली आहे.   

संशयी वृत्ती अन्‌ संताप 
ॲड. विद्या हुशार, हसतमुख आणि स्वभावाने शांत मनमिळाऊ होत्या. तर विरुद्ध स्वभावाचे त्याचे पती पती डॉ. भरत कटकटी आणि संतापी स्वभावाचे होते. कौटुंबिक त्रासाबाबत विद्या यांच्या माहेरी आणि त्यांच्या जवळच्या महिला सहकाऱ्यांना बऱ्यापैकी माहिती होती. घटनेच्या दिवशी रविवारी सुटीच्या कोर्टाचे कामकाज त्यांच्याच कडे होते. मात्र, रिमांडचे कामकाज नसल्याने त्यांनी सहकारी वकिलांना ऐनवेळचे कामकाज सांभाळण्याचे सांगितले होते. 

नव्या गाडीची बुकिंग 
ॲड. विद्या यांनी नुकतीच पती भरत यांच्यासाठी नव्या कारची चौकशी सुरू केली होती. कारच्या शोरूममधून माहिती घेत पती-पत्नीने महागडी कारही बुक केल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली. 

न्यायालयाचे कामकाज बंद 
जिल्हा न्यायालयात आणि परिचितांमध्ये ॲड. विद्या राजपूत याच नावाने परिचित होत्या. विद्या यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बुधवारी (ता.१६) न्यायालयाचे कामकाज बंद राहणार आहे. 

खुनाची कबुली...
ॲड. विद्या राजपूत यांचे मावस भाऊ गणेश पांडुरंग सुरळकर यांच्या तक्रारीवरून रात्री जामनेर पोलिस ठाण्यात पती डॉ. भरत लालसिंग पाटील, सासरे लालसिंग श्रीपत पाटील यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, डॉ.भरत पाटील यांना सकाळीच पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली. वैद्यकीय अहवालात ॲड. विद्या यांच्या अंगावर मारहाणीच्या खुणा असून, डॉ. भरत पाटील यांच्या एका हाताचे बोटही त्यात जखमी झाले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यावर डॉक्‍टरच्या शरीरावर झटापट होऊन प्रतिकार करताना डॉक्‍टरच्या शरीरावरही जखमा असल्याचे समोर आले असून. पोलिसांच्या प्राथमिक तपासात डॉ. भरत पाटील याने रात्री उशिरा आपण गळा दाबून मारल्याचे कबूल केल्याची माहिती विश्‍वसनीय सुत्रान्वये मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Poonch Attack: दहशतवाद्यांनी हवाई दलाच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात एक जवान शहीद; चार जखमी

'छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारा नेता नको'; राहुल गांधींचा व्हिडिओ का होतोय ट्रेंड?

HD Revanna : मोठी बातमी! ...अखेर माजी पंतप्रधानांच्या मुलाला एसआयटीने घेतले ताब्यात, काय आहे कारण?

Broccoli Paratha: सकाच्या नाश्त्यात खा पौष्टिक ब्रोकोली पराठा,जाणून घ्या रेसिपी

Latest Marathi News Live Update : प्रचाराचा आज सुपरसंडे, तोफा थंडावणार; जोरदार शक्तिप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT