arrest 1.jpg 
उत्तर महाराष्ट्र

हल्ला करून पसार होणाऱ्या खुनींचा सिनेस्टाइल पाठलाग

गोपाळ शिंदे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबई नाशिक महामार्गावर तळेगाव शिवारात सोमवार ( ता.२१ ) मध्यरात्री कंटेनर लुटमार करीत खुनी हल्ला करून पसार होणाऱ्या सराईत गुन्हेगारांना घोटी टॅबच्या वाहतूक पोलिसांनी सिनेस्टाइल पाठलाग करून अखेर जेरबंद केले आहे. तर परप्रांतीय जखमींना ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.याबाबत इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चार दरोडेखोरांनी केला प्राणघातक हल्ला

सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे आपल्या काही कर्माचा-यांसोबत मध्यरात्री १.३० दरम्यान महामार्गावर पेट्रोलिंगवर गस्त घालत असतांना नियंत्रण कक्षाकडून वायरलेस वरून अपना हॉटेल समोर दरोड्याची व खुनी हल्ला झाल्याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी आपले वाहन दरोड्याच्या घटनास्थळावर नेले असता दोन बिहारी परप्रांतीयांवर चाकूचे वार झाले होते. अनिलकुमार यादव हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तर चंदनकुमार यादव हा गंभीर जखमी अवस्थेत पडल्याचे दिसले. त्यांना तातडीने पोलीस वाहनांतून रुग्णालयात दाखल केले. कंटेनर लुटमार करतांना यांच्यावर हा प्राणघातक हल्ला चार दरोडेखोरांनी केल्याची माहिती त्यांनी दिली. कंटेनर मधील दस्तावेज व टायर खोलून पसार झाले होते. अशातच महामार्गावरून काही तरून पळतांना पोलिसांना दिसले त्यांचा पाठलाग करत असताना पोलिसांवर त्यांनी लाकडी दांडे व दगड फेक सुरु केली. मात्र पोलिसांनी जीवाची पर्वा न करता दोघांना हत्यारासह पकडले. संशयित आरोपी संतोष सुरेश जाधव,किरण सोमनाथ येले दोघेही  ( रा. हेल्याची मेट ता. त्र्यंबकेश्वर ) यांना पकडण्यात आले तर दरोड्यातील अन्य दोन साथीदार गोटीराम दामू आचारी,दीपक जाधव दोघेही ( रा. तळेगाव ता. इगतपुरी ) हे अंधाराचा फायदा घेत पसार झाले.

यामुळे होणार असंख्य गुन्ह्यांची उकल

या आरोपींना अनेकदा महामार्गावर दरोडे टाकतांना विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे असंख्य गुन्ह्यांची उकल होणार आहे. चौकट : घटनेची माहिती नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक आरती सिंह व महामार्ग पोलीस अधीक्षक दिगंबर प्राधान यांना समजताच घोटी टॅबच्या पोलिसांच्या  धाडसी कामगिरीचे कौतुक केले.

या धाडसी पोलिसांनी लावली जीवाची बाजी

सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार संतोष गांगुर्डे,महेंद्र बागल,राजेंद्र जाधव,सुर्यकांत पाटील,अर्जुन निंबेकर,विलास कावळे,संतोष माळोदे
 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये शेतीच्या वादातून तलवारीचा हल्ला; काकाची बोटं छाटली, चुलत भावावरही वार

SCROLL FOR NEXT