Mangesh-Patil 
उत्तर महाराष्ट्र

अनैतिक संबंध उघड झाल्याने मुलाची हत्या; आईसह तिघे ताब्यात

सकाळवृत्तसेवा

चोपडा - चहार्डी (ता. चोपडा) येथील शिवाजीनगर भागातील रहिवासी व शाळकरी विद्यार्थी मंगेश दगडू पाटील (वय १४) याचा गेल्या तीन आठवड्यांपूर्वी खून झाला. अनैतिक संबंधात तो अडसर आल्याच्या प्रकारातूनच त्याच्या आईसह तिघांनी निर्घृण खून केल्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. 

तीन आठवड्यांनंतर या घटनेचा उलगडा झाला आहे. मंगेश दगडू पाटील (वय १४) हा मुलगा शनिवारी (ता. २) दुपारी शाळेतून घरी आल्यानंतर शौचास जात असल्याचे कारण सांगत घराबाहेर पडला होता. त्यानंतर तो परत आलाच नाही. तो परत न आल्याने त्याचे वडील दगडू लोटन पाटील यांनी चोपडा शहर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

शिवाजीनगर शेजारील अर्ध्या किलोमीटर अंतरावर असलेल्या काटेरी झुडपात पायाचे तुकडे आढळल्याने खून केल्याचे निष्पन्न झाले. मात्र, त्यानंतर उर्वरित शव अजूनही म्हणजे तीन आठवड्यानंतरही मिळून आलेले नाही. नरबळी असल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र, या घटनेला वेगळेच वळण मिळाले असून, हा प्रकार अनैतिक संबंधात मंगेश अडसर ठरत असल्याने झाला आहे. मंगेश पाटील हा शाळेतून घरी आल्यानंतर शौचास जात असल्याचे कारण सांगत घराबाहेर पडला होता. तो परत आल्यानंतर आई गीताबाई ही संशयित राजेंद्र पंढरीनाथ पाटील यांच्या सोबत अश्‍लील प्रकार करताना दिसली. त्याने मी वडिलांना सांगेल असे सांगितल्याने संशयित राजेंद्र पाटील याने घरातील लाकडी दांडक्‍याने मंगेशच्या डोक्‍यात मारले. तो जमिनीवर लागलीच खाली पडला. त्यानंतर राजेंद्रने मंगेशचा मृतदेह एका गोणीत टाकून ती गोणी घरात लपवून ठेवली. गीताबाई हिचा भाचा समाधान याचेही गीताबाईशी अनैतिक संबंध होते. राजेंद्रने समाधानला विश्‍वासात घेत मंगेशचा मृतदेह समाधान, गीताबाई व राजेंद्र यांनी घराचे पाठीमागे असलेल्या शेतात नेला. कोयत्याने त्याचे पाय कापून त्याच्या अंगावरील कपडे काढून त्याचा कापलेला पाय व कपडे शेताच्या बाजूला असलेल्या काटेरी झुडपात फेकून दिले. उर्वरित भाग गोणीत भरून चहार्डी- वेले रस्त्यावरील खाणीतील पाण्यात फेकून गोणी नदीच्या पाण्यात फेकून दिली.

समाधान पाटील, राजेंद्र पाटील व गीताबाई या तिघांनी मिळून मंगेशचा खून केला असल्याची कबुली दिल्यानंतर आज न्यायालयात हजर केले असता पाच मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

खदाणीत मृतदेहाचा शोध 
मंगेशचा खून करून मृतदेह ज्या खाणीच्या पाण्यात टाकला आहे. त्या ठिकाणी मृतदेहाचा शोध करण्यासाठी धुळे येथील पथकाकडून पाणबुड्यांद्वारे शोधमोहीम सुरू होती. मात्र, सायंकाळी उशिरापर्यंत मृतदेह मिळून आला नाही. पोलिस उपअधीक्षक सौरभ अग्रवाल, प्रभारी पोलिस निरीक्षक मनोज पवार, पोलिस उपनिरीक्षक अर्चना करपुडे, पोलिस नाईक संदेश पाटील, शिवाजी बाविस्कर, हितेश बेहरे, सुनील कोळी, संतोष पारधी, विलेश सोनवणे यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.

माता न तू वैरिणी...
अश्वपतीची नव्हेस कन्या, नव्हेस माझी माय
धर्मात्म्यांच्या वंशी कृत्या निपजे, नांदे काय ?
वध नाथाचा करील मूढे, पतिव्रता का कुणी? यानुसार स्वतः च्या पोटाच्या गोळ्याचा खून करून त्याचा मृतदेह खदाणीत फेकून आईसह इतर दोन जण कांगावा करीत होते. अखेर पोलिसांनी आरोपींना शोधले असले, तरी जन्मदात्रीने पोटाच्या गोळ्याचा निर्दयीपणे खून करावा म्हणजे ‘माता न तूं वैरिणी’ असेच म्हणता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी तज्ज्ञ समितीची आज मुंबईत महत्त्वाची बैठक

माेठी बातमी! 'ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनवर सरकारचा डल्ला': राष्ट्रीय संघर्ष समिताचा आरोप; ८० लाखांहून अधिक पेन्शनधारकांची रक्कम गेली कुठे?

वाहनधारकांनो, ‘दंड भरा नाहीतर कोर्टात हजर व्हा’! पोलिसांनी ‘या’ वाहनचालकांना दंड भरण्यासाठी बजावले वॉरंट अन्‌ समन्स; ‘सीसीटीव्ही’त बेशिस्त वाहनचालक कैद

मोठी बातमी! अंशत: अनुदानित शाळांच्या टप्पा अनुदानासाठी शुक्रवारी विशेष कॅम्प; शाळांना अनुदानासाठी ‘या’ १७ कागदपत्रांचे बंधन; बायोमेट्रिक हजेरीला दिला पर्याय

Bribery Action: 'बोरगावचा तलाठी लाच घेताना जाळ्यात'; काेरेगाव तालुक्यात खळबळ, हक्कसोडपत्र करताे म्हणाला अन्..

SCROLL FOR NEXT