Aadhar
Aadhar 
उत्तर महाराष्ट्र

आधारमध्ये जन्मतारिख बदलणे झाले सोपे

गोपाळ शिंदे

घोटी - देशात नव्याने युआयडीएआयकडून आधार बाबतच्या परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामध्ये आधार संचालकांसह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. यामुळे देशभरतील नागरिकांचा क्षेत्रीय कार्यालयातील हेलपाटा वाचल्याने नागरिकांसह आधार केंद्र चालकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे. नवीन परिपत्रकानुसार आधारमधील जन्मतारिख ददलणे आता सोपे झाले आहे. 

सप्टेंबर २०१८ च्या परिपत्रकानुसार आधार कार्ड मधील जन्मतारीक तीन वर्षापेक्षा जास्त फरक असल्यास नागरिकांना आपापल्या राज्यातील युआयडीएआयच्या कक्ष कार्यालयात हेलपाटे मारावे लागत होते. त्यात दुर्गम आदिवासी बांधवांना कक्ष कार्यालय शोधणे तिथे दोन ते तीन दिवसांचा मुक्काम करणे आर्थिक तसेच मानसिक दुष्ट्या त्रासाचे ठरत होते. सोमवार (ता. १) नव्याने काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार आधार कार्ड वरील जन्म तारिख अथवा नावात दुसऱ्या तिसऱ्यांदा बदल करावयाचा असल्यास कक्ष कार्यालात जाण्याची आवश्यकता नसल्याचे नवीन परिपत्रकात प्रसिद्ध करण्यात आले आहे. वरील पैकी कोणत्याही प्रकारच्या आधारमध्ये बदल करावयाचा असल्यास टोल फ्री क्रमांक १९४७ अथवा ईमेल helf@vidai.gov.in किंवा पोस्टाने आपापल्या राज्यातील कक्ष कार्यालयात नागरिकांना आधारमधील बदलाकरीता मंजुरी मिळविण्यासाठी संपर्क साधण्याचे अवाहन युआयडीएआयकडून करण्यात आले आहे. 

महाराष्ट्र राज्यासाठी युआयडीएआय कक्ष कार्यालय, एमटीएनएल बिल्डींग, कफ परेड जीडी सोमाणी मार्ग मुंबई या पत्यावर अर्ज करता येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT