उत्तर महाराष्ट्र

जैताणेच्या सरपंचपदी ईश्वर न्याहळदे बिनविरोध

प्रा.भगवान जगदाळे

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील सर्वात मोठया सतरा सदस्यीय जैताणे (ता.साक्री) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी ग्रामपंचायत सदस्य ईश्वर कृष्णा न्याहळदे यांची आज (ता.28) बिनविरोध निवड झाली. दुपारी दोनला ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी तथा निजामपूर भागाचे मंडळाधिकारी एस.एस. चित्ते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत ही निवड झाली. ग्रामपंचायत सदस्य नानाभाऊ पगारे सूचक होते.

विकास, ग्रामविकास, समताविकास या तिन्ही पॅनलने गावात सलग दुसऱ्यांदा बिनविरोध सरपंच निवडीची परंपरा कायम राखत गावातील 'माळी-धनगर' समाजाच्या एकजुटीचा संदेश दिला. ठरल्याप्रमाणे मुदत संपल्याने सरपंच संजय खैरनार यांनी 28 ऑगस्टला राजीनामा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर ही निवड झाली.

गेल्या महिनाभरापासून ग्रामस्थांचे सरपंच निवडीकडे लक्ष लागून होते. सरपंचपदी ईश्वर न्याहळदे यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होताच समर्थक, कार्यकर्ते व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत चौकात फटाक्यांच्या आतषबाजीसह गुलाल, भंडाऱ्याची उधळण करत एकच जल्लोष केला. त्यानंतर कार्यकर्ते व समर्थकांनी ईश्वर न्याहळदे यांची गावातून जंगी मिरवणूक काढली.

निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी चित्ते यांना तलाठी युनूस सय्यद, प्रशांत माळी, भूषण रोजेकर, सुनील साळुंखे, ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड, वरिष्ठ लिपिक यादव भदाणे आदींसह कोतवाल व ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. सहाय्यक निरीक्षक दिलीप खेडकर, उपनिरीक्षक अनिल पाटील, कौतिक सुरवाडे आदींसह पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला.

विशेष सभेस नवनिर्वाचित सरपंच ईश्वर न्याहळदे, माजी सरपंच संजय खैरनार, उपसरपंच आबा भलकारे, ग्रामपंचायत सदस्य नानाभाऊ पगारे, शानाभाऊ बच्छाव, नवल खैरनार, गणेश देवरे, दादा भिल, रेवाबाई भिका न्याहळदे, सुरेखाबाई युवराज बोरसे, इंदूबाई परशराम खलाणे, पुष्पाबाई प्रकाश गवळे, प्रमिलाबाई दौलत जाधव, आशाबाई सुरेश सोनवणे, मनीषा राजेश बागुल, छाया प्रमोद कोठावदे व सुरेखा आबा भिल आदी सर्व सतरा सदस्य उपस्थित होते.

बैठकीत ठरल्याप्रमाणे सरपंचपदाची 'पहिली टर्म' ईश्वर न्याहळदे यांना देण्यात आली. तर येत्या दोन वर्षात धनगर समाजाच्या इतर सदस्यांनाही संधी दिली जाणार आहे. उपसरपंचपदी माळी समाजाच्या, इतर सदस्यांना संधी देण्याचे ठरले आहे. बिनविरोध निवडीसाठी धनगर समाजाचे गटनेते व मार्गदर्शक भगवान भलकारे, ईश्वर पेंढारे, मोतीलाल मोरे, माजी उपसरपंच नानाभाऊ पगारे यांच्यासह माजी सरपंच संजय खैरनार, गोकुळ पाटील, नवल जाधव, दौलत जाधव, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व माळी-धनगर समाजबांधवांनी विशेष प्रयत्न केले. आगामी काळात गावाच्या उपसरपंचपदी नेमकी कोणाची निवड होते? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

घर का न घाट का... उन्मुक्त चंदच ड्रीम झालं उद्ध्वस्त! गुजराती खेळाडू बनला World Cupमध्ये अमेरिकन संघाचा कर्णधार

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

SCROLL FOR NEXT