उत्तर महाराष्ट्र

"मी बेवारस'..चिठ्ठीत लिहून संपविली जीवनयात्रा 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील हरिविठ्ठलनगरातील 40 वर्षीय प्रौढाने राहत्या घरात साडीने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. मुलगा घरी परतल्यावर त्यास वडिलांनी आत्महत्या केल्याचे आढळून आले. रामानंदनगर पोलिसांना पाचारण करण्यात आल्यावर पंचनामा करून मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. "माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही, माझा मृतदेह बेवारस समजून कचराकुंडीत टाकावा', अशी चिठ्ठी लिहून राजेश हिंमत मकवाना (वय 40) यांनी आत्महत्या केली. 
हरिविठ्ठलनगरातील भाटवाडा दुर्गादेवी मंदिराजवळील रहिवासी राजेश हिंमत मकवाना हे रंगकाम करत होते. त्यांना विक्की, राहुल आणि देवेंद्र अशी तीन मुले असून, पत्नी रेखा या दिवाळीनिमित्त माहेरी गेल्या होत्या. आज दुपारी घरी एकटेच असताना छताच्या पंख्याला साडीने गळफास घेत आत्महत्या केली. मुलगा विक्की घरी आल्यावर दुपारी वडील त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. आक्रोश करतच विक्कीने हंबरडा फोडल्याने शेजाऱ्यांनी धाव घेतली. रामानंदनगर पोलिसांना पाचारण करण्यात आल्यावर पंचनामा करून मृतदेह खाली उतरवून जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. घरातून राजेश यांनी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली असून, रामानंदनगर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस नाईक रवी नरवाडे तपास करीत आहेत. 


चिठ्ठीचे रहस्य उलगडेना..! 
राजेश मकवाना यांनी मृत्युपूर्वी लिहिलेल्या चिठ्‌ठीत.."माझ्या मृत्यूला कोणीही जबाबदार नाही, मी स्वत: मृत्यूला कारणीभूत आहे. माझ्या मृतदेहाला बेवारस समजून कचराकुंडीत टाकावा, हीच नम्र विनंती, सर्वांना सद्‌बुद्धी प्राप्त होवो, हीच बुद्धचरणी प्रार्थना, मी एकटा आहे, त्यामुळे मी बेवारस आहे, तरी कुणासही जबाबदार धरू नये, असा चिठ्ठीचा आशय असून, चिठ्ठीमुळे कुटुंबीयांनाही प्रचंड धक्का बसला असून, राजेश यांना प्रकाश, मधुकर आणि यशंवत असे तीन भाऊ असून, चौघे भाऊ वेगळे राहत होते. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: सलमान खानच्या घरावर गोळीबार प्रकरणी तीन आरोपींना पोलीस कोठडी तर एकाला न्यायालयीन कोठडी

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT