do rajendr sing 
उत्तर महाराष्ट्र

मोदी सरकारचे गंगा सफाईचे 20 हजार कोटी पाण्यातः डॉ. राजेंद्रसिंह 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने गेल्या पाच वर्षात देशात गंगा सफाई योजना राबविली त्याबाबत ते म्हणाले, कि गेल्या पाच वर्षात सरकारने गंगा सफाईवर केलेले 20 कोटी रूपये खर्च वाया गेलेले आहे. ही योजना अत्यंत चुकिच्या पध्दतीने राबविली आहे. त्यांनी केवळ घाट बांधण्यावरच रक्कम खर्च केली आहे असे मत जलतज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. 

पुढे बोलतांना ते म्हणाले, की हदयावर ईलाज हदययाच्या तज्ञाकडून आवश्‍यक असतांना दाताच्या डॉक्‍टरकडून त्यावर उपचार केल्यास त्यावर कोणताच फायदा होत नाही. अगदी तसेच झाले आहे. नैसिर्गिक स्त्रोतातून गंगा नदी वाहती करण्याची गरज असतांना, त्यावर घाट बांधले आहेत. शिवाय नदीवर बांधही घालण्यात आले आहेत. त्यामुळेच ही नदी स्वच्छ नव्हे तर केवळ मैलाच वाहत आहे. केंद्र शासनाने आम्हाला आश्‍वासन दिले होते, कि गंगा नदीचा फ्लो नैसर्गिक पध्दतीने ठेवण्यात येईल परंतु ते आश्‍वासन पाळले नाही. त्यामुळे साध्वी पदमावती यांनीं आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांचा आज 
39 वा दिवस आहे. गंगा नैसर्गिक पध्दतीने वाहीली पाहिजे यासाठी देशात आगामी काळात मोठे आंदोलन केले जाईल असेही त्यानीं सांगितले. 

जलयुक्त शिवार योजना बंद करणे चुकीचे 
महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली जलयुक्त शिवार ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त योजना आहे, मात्र शेवटच्या टप्प्यात ठेकेदारामार्फत ही योजना राबविल्याने या योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टचार झाला आहे. परंतु आता शासनाने ही योजनाच बंद करण्याच घेतलेला निर्णय चुकिचा आहे. शासनाने सामुदायिक चळवळीच्या माध्यमातून ही योजना चालू ठेवावी. 

पीक पध्दती बदलण्याची गरज 
आगामी काळात जागात पाण्यासाठी युध्द होणार असल्याचे स्पष्ट करून डॉ.राजेंद्रसिंह यांनीं सांगितले, तिसरे युध्द हे पाण्यासाठी तहानलेली राष्ट्रे आणि पाणी समृध्दीची पॉवर ज्यांच्याकडे अशी राष्ट्रे यांच्यात होणार आहे. भारतातही पाण्याची समस्या बिकट होणार आहे. त्यामुळे अद्यापही वेळ आहे. त्यामुळे हवामानावर अधारीत पिके घेण्याची गरज आहे. सामुदायिक पध्दतीने शेती करण्याची गरज आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT