उत्तर महाराष्ट्र

मक्‍तेदाराचा प्रशासनावरच पलटवार 

सकाळ वृत्तसेवा

जळगाव ः शहरातील दैनंदिन कचरा संकलन व स्वच्छतेचा महापालिका प्रशासनाने वॉटरग्रेस कंपनीला एकमुस्त ठेका दिला आहे. मात्र मक्तेदाराच्या कामाबाबत तक्रारी आल्याने महापालिकेने मक्तेदाराला मक्ता रद्द का करण्यात येऊ नये अशी अंतिम नोटीस बजावून सात दिवसात खुलासा 
मागविला होता. त्यावर मक्तेदाराने प्रशासनाकडे पाच पानाचा खुलासा सादर करत प्रशासनावरच पलटवार केला आहे. 

महापालिकेने शहरातील दैनंदिन स्वच्छतेचा नाशिकच्या वॉटरग्रेस कंपनीला पाच वर्षासाठी 75 कोटींचा एकमुस्त ठेका दिला. ऑगस्ट महिन्यापासून सुरू झालेला हा मक्ता नेहमी वादाच्या भोवऱ्यात तसेच वारंवार तक्रारी येत होत्या. तरी देखील मक्तेदाराच्या कामकाजात सुधारणा होत नसल्याने पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे मक्ता रद्द करावा अशी मागणी केली होती. त्यामुळे प्रशासनाने मक्तेदाराला मक्ता रद्द का करण्यात येऊ नये अशा आशयाची अंतिम नोटीस बजावून सात दिवसात खुलासा मागविला होता. दरम्यान, मक्तेदाराने सोमवारी मनपा प्रशासनाकडे पाच पानाचा खुलासा दिला आहे. मक्तेदाराने अनेक मुद्यांवर महापालिकेवर ताशेरे ओढले आहे. त्यामुळे आता प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे. 

असा दिला खुलासा 
वॉटर ग्रेस कंपनीने दिलेल्या खुलाशात एकतर्फी दंडात्मक कारवाई, बेकायदेशीर कपात, खर्च भागत नाही, आर्थिक अडचणी, तसेच घंटागाड्याची सर्व्हिसची मुदत संपल्याने त्या बंद पडत आहे. 85 घंटागाड्यापैकी 15 वाहने बंद आहेत. 7 कॉम्प्कटरपैकी 3 बंद आहेत. 2 डंपर बंद आहेत. कचऱ्याचे वजन करण्यासाठी मनपाने 4 वजन काटे उपलब्ध करून दिले नाही. तसेच संकलन केंद्रावर सुविधा दिल्या नाही. दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे असे मक्तेदाराने खुलाशात म्हटले आहे. 
 
अन्‌... फाइल सापडली 
मक्तेदाराने सोमवारी आरोग्य विभागाकडे खुलासा दिला होता. मात्र माहिती देण्यास टाळाटाळ करून फाइल सापडत नसल्याचे कारणे दाखविले जात होती. अखेर रात्री उशिरापर्यंत त्या फाइलचा शोध घेण्यात येऊन ती फाइल आरोग्य अधिकाऱ्यांकडे सापडली. उपायुक्तांच्या टिपणीनंतर आयुक्तांकडे फाइल दिली जाणार आहे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींच्या रोड शो साठी महायुतीच्या नेत्यांची पुण्यात बैठक

SCROLL FOR NEXT