Deputy Superintendent of Police S. Rishikesh Reddy, Assistant Police Inspector of Traffic Branch Bhushan Kote and team. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: मुलांची ‘हिरो‘गिरी; पालकांना भुर्दंड! 18 वर्षाखालील, विनापरवाना दुचाकीचालक विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई

Dhule : पुणे येथे अल्पवयीन मुलाने पोर्शे स्पोर्टस कार चालवून अपघातात दोघांचा जीव घेतल्याच्या प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर धुळे शहर पोलिसांनी विशेष कारवाई मोहीम राबविली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : पुणे येथे अल्पवयीन मुलाने पोर्शे स्पोर्टस कार चालवून अपघातात दोघांचा जीव घेतल्याच्या प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर धुळे शहर पोलिसांनी विशेष कारवाई मोहीम राबविली. त्यात अठरा वर्षांखालील व विनापरवाना १३ दुचाकीचालक विद्यार्थ्यांना दंड ठोठावण्यात आला. प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची रक्कम त्यांच्या पालकांकडून वसूल केला. शहरात १८ वर्षांखालील तसेच, विनापरवाना अनेक मुले वाहन चालवितात. ( Penal action against students under 18 years of age driving two wheeler )

त्यामुळे अपघात होऊन वाहनचालकांच्या व अन्य नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होतो. अशा प्रकारांना आळा बसावा म्हणून पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे व पोलिस उपअधीक्षक एस. ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मुख्य रस्त्यांवर शहर वाहतूक शाखेतील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी सोमवारी (ता.२७) सायंकाळी पाच ते सातदरम्यान विशेष मोहीम राबवली. त्यात १८ वर्षांखालील विद्यार्थी तसेच वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या विद्यार्थ्यांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. (latest marathi news)

या १३ वाहनचालकांच्या पालकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे एकूण ६५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम यापुढेही सुरू राहील. पालकांनी आपल्या १८ वर्षांखालील पाल्यांना तसेच वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या पाल्यांना वाहन चालविण्यास देऊ नये असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे साहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण कोते केले.

जॅमर लावून कारवाई

काहीजण रस्त्यांवर वाहने लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. यावर उपाय म्हणून येत्या आठवड्यात जॅमर खरेदी केले जातील. जे वाहनधारक रस्त्यात बेशिस्तपणे वाहन लावतील, अशा वाहनांना जॅमर लावून कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस उपअधीक्षक एस. ऋषीकेश रेड्डी यांनी दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak Case : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयचा मोठा खुलासा; कोर्टात उघड झाले धक्कादायक तपशील, मनिषा मांढरेचा घटनाक्रम सांगितला

Night Heat Reason : सूर्य मावळला तरी घरात उकडतंय? रात्रीसुद्धा एवढं गरम का वाटतं? वैज्ञानिकांनी सांगितलं आश्चर्यकारक कारण

Shaktipeeth Highway Protest : शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापुरातील शेतकरी संतप्त, पुणे-सोलापूर महामार्ग ठप्प; राजू शेट्टी पोलिसांत शाब्दिक चकमक

“लोकसंख्या कमी करायची जबाबदारी आहे माझ्यावर…” शंशाक केतकर व्हिडिओ शेअर करत म्हणाला... 'हिंदू आहे आणि...'

Latest Marathi News Live Update : चांदीच्या आयातीवर केंद्र सरकारचे निर्बंध; दरवाढीची शक्यता

SCROLL FOR NEXT