मुंबई - मुख्यमंत्र्यांसोबत गुरुवारी झालेल्या बैठकीस उपस्थित एकनाथराव खडसे, आमदार सुरेश भोळे, आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिता वाघ, गुरुमुख जगवानी, सेंट्रल फुले मार्केटचे अध्यक्ष रमेश मताणी, फुले मार्केटचे अध्यक्ष हिरानंद मंधवानी, राजेश वरयाणी, बाबू कौरानी.
मुंबई - मुख्यमंत्र्यांसोबत गुरुवारी झालेल्या बैठकीस उपस्थित एकनाथराव खडसे, आमदार सुरेश भोळे, आमदार शिरीष चौधरी, आमदार स्मिता वाघ, गुरुमुख जगवानी, सेंट्रल फुले मार्केटचे अध्यक्ष रमेश मताणी, फुले मार्केटचे अध्यक्ष हिरानंद मंधवानी, राजेश वरयाणी, बाबू कौरानी. 
उत्तर महाराष्ट्र

कायदेशीर बाबी तपासूनच गाळ्यांबाबत निर्णय घेणार

सकाळवृत्तसेवा

जळगाव - फुले मार्केट व सेंट्रल फुले मार्केटमधील गाळेधारकांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी कायदेशीर बाबी तपासूनच गाळ्यांबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुदत संपलेले व थकबाकी असलेले गाळे ताब्यात घेण्याबाबत औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिले आहेत. त्यामुळे शहरातील अठरा व्यापारी संकुलाच्या गाळेधारकांवर गाळे जप्तीची टांगती तलवार आहे. त्याबाबत गाळेधारकांच्यावतीने सेंट्रल फुले मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष रमेश मताणी, फुले मार्केट असोसिएशनचे अध्यक्ष हिरानंद मंधवानी, राजेश वरयानी, बाबू कौरानी या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे, आमदार सुरेश भोळे, शिरीष चौधरी, हरिभाऊ जावळे, श्रीमती स्मिता वाघ उपस्थित होते. यावेळी फडणवीस यांनी गाळेधारकांची समस्या ऐकून घेतली. याबाबत सर्व कायदेशीर बाबी तपासूनच निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT