Bahinabai Chaudhari uttar Maharashtra University esakal
उत्तर महाराष्ट्र

KBCNMU Revaluation Result : पुनर्मूल्यांकनाचे निकाल आठवडाभरात; चर्चेअंती कुलगुरूंचे आश्‍वासन

सकाळ वृत्तसेवा

KBCNMU Reevaluation Result : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत विविध परीक्षांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत.

हे निकाल लवकरात लवकर जाहीर करावेत, अशी मागणी विद्यापीठ विकास मंच सिनेट सदस्यांच्या शिष्टमंडळाने कुलगुरूंकडे केली. कुलगुरू प्रो. विजय माहेश्‍वरी यांनी आठवडाभरात निकाल जाहीर करण्याचे आश्‍वासन दिल्याचे विद्यापीठ विकास मंचाने म्हटले आहे.

(kbcnmu Revaluation results within week Vice Chancellor assured dhule news)

विविध परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज दाखल केले त्यांचे निकाल जवळपास दीड-दोन महिने लोटले तरी अद्याप जाहीर न झाल्याने संबंधित विद्यार्थ्यांना पुढील वर्षाच्या प्रवेशासाठी व पुढील परीक्षा फॉर्म भरण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

या पार्श्वभूमीवर विद्यापीठ विकास मंचाच्या सिनेट सदस्यांच्या शिष्टमंडळाने विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. माहेश्‍वरी यांची भेट घेत, त्यांना याबाबत निवेदन दिले. सर्व राखीव व पुनर्मूल्यांकनाचे निकाल लवकरात लवकर जाहीर करावेत, अशी मागणी केली.

शिष्टमंडळात विद्यापीठ विकास मंचाचे सिनेट सदस्य नितीन ठाकूर, दिनेश चव्हाण, प्रा. केदारनाथ कवडीवाले, स्वप्नाली काळे, भानुदास येवलेकर, दिनेश नाईक यांचा समावेश होता. कुलगुरू प्रो. माहेश्‍वरी यांनी येत्या आठवडाभराच्या आत सर्व निकाल जाहीर करण्याचे आश्‍वासन दिल्याचे विद्यापीठ विकास मंचाने म्हटले आहे.

६५८ निकाल बाकी

काही विशिष्ट विषयांसाठी प्राध्यापकांची कमतरता, आरसी विभागात चेकिंग सिस्टिममध्ये लागणारा वेळ आदी विविध कारणांनी निकाल घोषित करण्यास उशीर होतो.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

एकूण १६ हजार ७७६ अर्ज प्राप्त असून, त्यातील १६ हजार २३३ निकाल जाहीर करण्यात आले आहेत. ६५८ निकाल बाकी असल्याचे, संबंधित विद्यार्थ्यांचे कुठलेही नुकसान होऊ देणार नसल्याचे आश्‍वासन कुलगुरू माहेश्‍वरी यांनी दिले.

तक्रारींसाठी व्यवस्था

भविष्यात पुनर्मूल्यांकनाचे निकाल वेळेत लागण्याच्या दृष्टीने शाखानिहाय स्वतंत्र वेळापत्रक करण्यात येईल. तसेच विद्यापीठात परीक्षा विभागाशी विद्यार्थ्यांचा संपर्क होत नसल्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या तक्रारींना न्याय देण्यासाठी स्वतंत्र दोन लँडलाइन फोन क्रमांक, एक व्हॉट्सॲप क्रमांकाचीही लवकरात लवकर व्यवस्था विद्यापीठाच्या वेबसाइटवर जाहीर करण्यात येईल.

विधी विषयाच्या निकालासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये नेहमीच नाराजी असल्याने या संदर्भात महाविद्यालयस्तरावर विद्यार्थ्यांना आदर्श मॉडेल आन्सर संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचेही कुलगुरूंनी सांगितल्याचे विद्यापीठ विकास मंचाने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT