felicitation Kirti Gundlekar who won the bronze medal in the Women's Maharashtra Kesari Wrestling Tournament.
felicitation Kirti Gundlekar who won the bronze medal in the Women's Maharashtra Kesari Wrestling Tournament. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : कांस्यपदकप्राप्त कीर्ती गुंडलेकरचा धुळ्यात सत्कार; जिल्ह्यातील पहिली खेळाडू!

सकाळ वृत्तसेवा

धुळे : सांगली येथे झालेल्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत धुळे शहरातील कीर्ती गुंडलेकर हिने ५३ किलो वजनगटात कांस्यपदकाची कमाई केली. महिला केसरी कुस्ती स्पर्धेत पदक मिळविणारी कीर्ती जिल्ह्यातील पहिलीच खेळाडू ठरली.

या यशाबद्दल तिचा शहरातील मिल परिसरवासीयांतर्फे सत्कार करण्यात आला. (Keerti Gundlekar bronze medal winner in womens Kesari wrestling tournament felicitated in dhule news)

पहिल्या दिवसापासून कीर्तीने स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली. तिने कांस्यपदक पटकावले. यापूर्वी आळंदी येथे झालेल्या राज्यस्तरीय महिला सीनिअर कुस्ती स्पर्धेत तिने सुवर्णपदक पटकावले होते. तसेच राष्ट्रीय पातळीवरही तिने पदकांची कमाई केली.

कीर्तीचे काका तथा कुस्ती प्रशिक्षक त्रिलोक गुंडलेकर यांनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक पटकावले होते. श्री. गुंडलेकर राष्ट्रीय तालीम संघाच्या जिल्हा कार्यकारिणीत तांत्रिक समितीप्रमुख आहेत. तसेच राष्ट्रीय व राज्य कुस्ती स्पर्धेसाठी ते पंच म्हणून काम पाहतात.

हेही वाचा : नोकरदार असाल तर रोखीनंच घ्या कार

दरम्यान, या यशाबद्दल जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे, संजय अग्रवाल, उपाध्यक्ष सुनील महाले, चंद्रकांत सैंदाणे, रावसाहेब गिरासे, दिलीप लोहार, गोकुळसिंग परदेशी, सचिव सुनील चौधरी, उमेश चौधरी, संघाचे अध्यक्ष रवींद्र आघाव, कार्याध्यक्ष भास्कर पाटील, महेश बोरसे, संदीप पाटोळे, सचिन कराड, गणेश फुलपगारे, श्याम कानडे, पवन चौधरी, दिलीप जगताप, योगेश चव्हाण, भिकन चौधरी, संजय चौधरी, तसेच धुळे जिल्हा व तालुका तालीम संघाचे पदाधिकारी यांनी कीर्तीचे कौतुक केले.

तिच्या यशाबद्दल मिल परिसरवासीयांतर्फे सत्कार करण्यात आला. नगरसेवक अमोल मासुळे, धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष मनोज गर्दे, राजू सुपनर, मनोज सरगर, अनिल थोरात, राज सरग, कौशल गुंडलेकर, देवा सोनवणे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Malviya: "आता राहुल गांधी दलितांची माफी मागणार का?" रोहित वेमुला प्रकरणी अमित मालवीय यांचा सवाल

Nepal: नेपाळचे मोठे धाडस! 100 रुपयांच्या नोटेवर छापणार नवा नकाशा; भारताच्या 'या' भागांचा समावेश

Murder In Mahim: पत्रकार, पोलीस अधिकारी अन् मर्डर मिस्ट्री; 'मर्डर इन माहीम'चा ट्रेलर रिलीज, सीरिज 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT