mla khoskar.jpg 
उत्तर महाराष्ट्र

नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची आ.खोसकरांची मागणी

गोपाळ शिंदे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : परतीच्या अवकाळी पावसाने तालुक्यातील भात मुख्य पिकांसह बागायती पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे नवनिर्वाचित आमदार हिरामण खोसकर यांनी बुधवार (ता. ३०) दुपारी एका वाजता तहसीलदार अर्चना भाकड-पागेरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नुकसानग्रस्त भागांचा दौरा करत शेतकऱ्यांना दिलासा

तालुक्याच्या पूर्व पट्ट्यासह मध्य व पश्चिम भागात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला आहे. कापणीला आलेले पिके डोळ्यासमोर नासधूस होत आहे. भात पिकांची व  बागायती तसेच चाऱ्याचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वर नुकसानग्रस्त भागातील पिकांचे तातडीने पंचनामे करण्यात यावे अशी मागणी आमदार हिरामण खोसकर यांनी तहसीलदार अर्चना भाकड-पागेरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यानंतर काही नुकसानग्रस्त भागांचा दौरा त्यांनी करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम केले.

आ. खोसकर यांच्यासह उपस्थित पदाधिकारी व शेतकरी

यावेळी राष्ट्रवादी प्रदेश सरचिटणीस अँड संदीप गुळवे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संपत सकाळे,सदस्य जनार्धन माळी,गोरख बोडके,शिवा काळे,काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष रामदास धांडे, बाळासाहेब वालझाडे,माजी सभापती गोपाळा लाहंगे,उदय जाधव, कचरू पा. शिंदे,लहाणू हिंदोळे,विष्णू चव्हाण,पांडुरंग वारुंगसे,रामचंद्र म्हसने,बाळासाहेब कुकडे,ईश्वर सहाणे,नारायण वळकंदे,अरुण भोर,विजय कडू,गोपाळ भगत,उत्तम शिंदे,संतोष रौदळ यांसह शेतकरी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hockey World Cup: पेनल्टी कॉर्नर ठरले भारताचे अस्त्र! स्वातंत्र्यदिनी वेल्सला हरवत विजयी सुरुवात

Crime: एका संशयाने नात्याला काळिमा! सासू आणि पत्नीच्या वादातून संताप अनावर; जावयाने उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?

Marathi News Live Updates : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भोर तालुक्यात होणारा संभाव्य अनर्थ भोर पोलिसांनी टाळला

IND vs SL: देवदत्त पडिक्कलचे स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक शतक, ८० वर्षात कोणालाही न जमलेला केला पराक्रम! पहिल्या दिवशी भारताचे वर्चस्व

Skincare Tips: चेहऱ्यासाठी प्रत्येक वेळी घरगुती उपाय नसतात फायदेशीर! जाणून घ्या त्वचातज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला...

SCROLL FOR NEXT