Ved-Rahi
Ved-Rahi 
उत्तर महाराष्ट्र

साहित्यिक वेद राही यांना कुसुमाग्रज पुरस्कार

सकाळवृत्तसेवा

नाशिक - यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे यंदाचा ‘कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य’ पुरस्कार डोगरी साहित्य अन्‌ चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल वेद राही यांना मंगळवारी जाहीर झाला. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र, शाल व श्रीफळ, असे पुरस्काराचे स्वरूप असून, लवकरच विशेष सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात येईल.

कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी यासंबंधीची घोषणा केली. विद्यापीठातर्फे २०१० पासून ‘कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य’ पुरस्कार दिला जातो. जयंत कैकीनी, चंद्रकांत देवताले, डॉ. विष्णू खरे यांच्यासह इतर साहित्यिकांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राही यांचा जन्म १९३३ मध्ये जम्मू-काश्‍मीरमध्ये झाला आहे. त्यांनी सुरवातीला उर्दू भाषेतून लेखनाला सुरवात केली. पुढे हिंदी आणि डोगरी भाषेतून लिखाण केले. डोगरी भाषेत त्यांच्या सात कादंबऱ्या, तीन कथासंग्रह, एक काव्यकथा आहे. हिंदी आणि उर्दू भाषेत त्यांनी अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह व काव्यसंग्रह लिहिले आहेत. काश्‍मिरी संत कवी यांच्या जीवनावर आधारित मूळ डोगरी भाषेतील त्यांची कादंबरी ‘लाल देड’ ही प्रसिद्ध आहे. १९८३ मध्ये डोगरी भाषेतील ‘आले’ या त्यांच्या कादंबरीला ‘साहित्य अकादमी’ पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. राज्य सरकारने १९९० मध्ये मानाच्या ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्काराने त्यांना सन्मानित केले आहे. रामानंद सागर यांच्यासोबत त्यांनी पंचवीस चित्रपटांसाठी कथा, पटकथा, संवाद लिहिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan Firing: त्याने स्वतःला संपवलं नाही..अनुज थापरची हत्या? कुटुंबीयांच्या दाव्याने एकच खळबळ

Viral Video: खिशात खेळण्यातली पिस्तूल सापडल्यानंतर पकडले कान, मुंबई मेट्रो स्टेशन वरील चिमुकल्याचा व्हिडिओ व्हायरल

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Heeramandi: हिरामंडी पाहिल्यानंतर 'या' कारणामुळे भडकला अभिनेता; म्हणाला, "इतका अन्याय का? निराशाजनक! "

Latest Marathi News Live Update : कल्याणमधून श्रीकांत शिंदे अर्ज भरणार, जोरदार शक्तीप्रदर्शनाची तयारी

SCROLL FOR NEXT