उत्तर महाराष्ट्र

कोल्ड्रिंक्‍समध्ये गुंगींचे औषध मिसळून 11 लाखांचे कॅमेरे लंपास 

सकाळवृत्तसेवा

नाशिक - लग्नाच्या साखरपुड्याचे व्हिडिओ शुटिंग करण्याच्या ऑर्डरसाठी मुंबईतील फोटोग्राफरला नाशिकला बोलावून घेतले. त्यानंतर एका हॉटेलमध्ये त्यांना कोल्ड्रिंक्‍समधून गुंगींचे औषध पाजले आणि त्यानंतर संशयितांनी फोटोग्राफरचे सुमारे 11 लाख रुपयांचे महागडे कॅमेरे चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शुद्धीवर आल्यानंतर फोटोग्राफरने सरकारवाडा पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करीत आहेत. 

निर्मल यशपाल सिंह (रा. राजेनगर, साकीविहार रोड, पवई) या फोटोग्राफरचा फोटोग्राफी आणि व्हिडिओग्राफीचा व्यवसाय आहे. निर्मल सिंह यांना मुंबईतीलच संशयित ललित व आकाश (पूर्ण नाव व पत्ते नाहीत) यांनी फोनवरूनच संपर्क साधला होता आणि नाशिक येथे साखरपुड्याच्या व्हिडिओ आणि फोटो शुटिंगची ऑर्डर असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे निर्मल सिंह व त्याचा साथीदार गेल्या शनिवारी (ता.15) नाशिकमध्ये आले असता, त्यांना संशयितांनी वकीलवाडीतील हॉटेल पंचवटीमधील एका रुममध्ये घेऊन गेले. रात्री आठ वाजेच्या सुमारास संशयितांनी संगनमताने निर्मल सिंह व त्यांच्या साथीदाराच्या कोल्ड्रिंक्‍समध्ये गुंगींचे औषध मिसळवून ते त्यांना पिण्यास दिले. त्यामुळे काही वेळानंतर दोघांनाही गाढ झोप आली. यादरम्यान दोघा संशयितांनी निर्मल सिंह यांच्याकडील 11 लाख रुपयांचे महागडे कॅमेरे चोरून नेले. यात 4 लाख रुपयांचा कॅननचा एसडी मार्क कॅमेरा, 4 लाख रुपयांचा कॅननचा एसडी 4 कॅमेरा, 3 लाख रुपयांचा कॅननचा एसडी. मार्क 4 असे तीन कॅमेरे चोरून नेले आहेत. दुसऱ्या दिवशी रविवारी (ता.16) सकाळी ते जेव्हा शुद्धीवर आले, त्यावेळी खोलीमध्ये त्यांना त्यांचे कॅमेरे दिसून आले नाही. त्यावरून फसवणूक झाल्याची लक्षात येताच त्यांनी सरकारवाडा पोलिस ठाणे गाठून घडलेली हकिकत सांगितली. त्यानुसार सरकारवाडा पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी हॉटेल पंचवटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी ताब्यात घेतले आहेत. त्यावरून संशयितांची ओळख पटविण्याचा आणि त्यांचा माग काढण्याचा प्रयत्न पोलिस करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT