bhaskar ghuge.jpg
bhaskar ghuge.jpg 
उत्तर महाराष्ट्र

नेत्यांचा नुकसान पाहणीदौरा सुरु असतानांच आत्महत्येने खळबळ

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : रोझे (ता.मालेगाव) येथील शेतकरी भास्कर रामा घुगे (65) यांनी शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास शेतातच गळफास घेवून आत्महत्या केली. परतीच्या व अवकाळी पावसामुळे भुईसपाट झालेले पीक व कर्जाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केली. 
तालुक्यातील कोठरे येथील केदा देवरे यांनी २ दिवसांपूर्वी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. आणि आज (ता.१) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार,, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, राज्यमंत्री दादा भुसे जिल्ह्यात नुकसानीचा आढावा घेत पाहणी करत असतांनाच या आत्महत्येने खळबळ उडाली आहे.

मालेगाव तालुक्यात सलग दुसरी शेतकरी आत्महत्या.

भास्कर घुगे यांची पाडळदे शिवारात एक हेक्टर तीस आर शेती आहे. शेतातील खरीपाचे कापूस, बाजरी व मका भुईसपाट झाला. अवकाळीने दाणादाण उडवली. उत्पादन येणार नाही. महाराष्ट्र बँकेचे कर्ज कसे भरावयाचे याची त्यांना चिंता होती. कर्जाची निश्चित रक्कम समजू शकली नाही. तसेच मुले व मुलीच्या लग्नासाठी नातलगांकडुन घेतले दोन ते अडीच लाख रुपये घेतलेले परत करायचे होते. सततचा दुष्काळा नंतर  या वर्षी चांगले पिक येईल ही आशा होती. पण निसर्गाने साथ दिली नाही , आणि अवकाळी पावसाने पुर्णपणे उत्पादन हिरावून घेतल्याने नैराश्यातून घुगे यांनी आत्महत्या केली. याबद्दल पंचक्रोशीसह तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे. मंडलअधिकारी एस. टी. विधाते, तलाठी पी. डी. खैरनार यांनी रोझे येथे भेट देवून पंचनामा केला. तहसिलदार चंद्रजित राजपुत यांनी या घटनेची माहिती घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

IPL 2024 RCB vs GT Live Score: शुभमन गिलही स्वस्तात बाद! गुजरातच्या दोन्ही सलामीवीरांना सिराजने धाडले माघारी

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

MPSC : मुख्य परीक्षा होऊन चार महिने झाले तरी निकाल लागेना; गट क संवर्गातील ७ हजार ५१० उमेदवारांचे भवितव्य टांगणीला

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

SCROLL FOR NEXT