aambasan
aambasan 
उत्तर महाराष्ट्र

अंबासन येथे बिबट्याला पकण्यात यश

दीपक खैरनार

अंबासन (नाशिक) - बागलाण तालुक्यातील द्याने येथील बोळाई शिवारात पंकज कापडणीस यांच्या शेताजवळ गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्यांची दहशत निर्माण झाली होती. या भागातील अनेक पाळीव जनावरे बिबट्याने फस्त केल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. बिबट्यांच्या बंदोबस्त करण्यासाठी परिसरात सटाणा वनविभागाने गेल्या काही दिवसांपूर्वी पिंजरा लावला होता. सोमवारी (ता.४) रोजी रात्री आठच्या सुमारास बिबट्या पिंज-यात अडकल्याने शेतक-यांनी निश्वास सोडला. 

बोळाई शिवारात गेल्या चार ते पाच महिन्यांपासून बिबट्यांची दहशत निर्माण झाली होती. येथील शेतक-यांनी सटाणा वनविभागाशी संपर्क साधून अनेक वेळा माहिती दिली. बिबट्याने अनेक पाळीव जनावरे या परिसरात फस्त केल्याने शेतक-यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. ग्रामस्थांच्या मागणीनुसार बिबट्याच्या बंदोबस्तसाठी वनविभागाने गेल्या काही दिवसांपूर्वीच या परिसरात पिंजरा लावून ठेवला होता. 

सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास बिबट्याच्या डरकाळी फोडण्याचा आवाज परिसरातील पंकज कापडणीस, सारीका कापडणीस, संजय कापडणीस, खंडू कापडणीस, पोपट जाधव, राकेश भामरे, रावसाहेब जाधव व नरेंद्र कापडणीस यांनी ऐकताच पिंज-याकडे दाखल झाले. शेतक-यांनी पिंज-यात बिबट्या अडकल्याचे पाहून सटाणा वनविभागाचे वनपरिक्षत्र आधिकारी आर. एस.साठे यांना कळविले. रात्री काही वनकर्मचा-यांना पाचारण करीत बिबट्याला पिकअप वाहनातून दोधेश्वर येथील रोपवाटीकेत हलविण्यात आले. बिबट्याला अन्य जंगलात जाऊन मुक्त केले जाणार असल्याचे वनविभागाच्या आधिका-यांनी सांगितले.

बिबट्यांची दहशत कायम
...या परिसरात अनेक बिबटे जायबंदी झाले असले तरी अजूनही बिबट्यांचा मुक्त संचार कायम असल्याचे चित्र आहे. अंबासन येथील वाघाड नाल्यात मंगळवारी (ता.५) रोजी पहाटे काही शेतक-यांना बिबट्याने दर्शन दिल्याने घबराट पसरली आहे. या परिसरातील चार ते पाच बिबट्यांचा वावर असल्याचे बोलले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Varsha Gaikwad: अर्ज भरण्यापूर्वीच वर्षा गायकवाड यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर, उमेदवारीला विरोध करत काँग्रेस नेत्यांची बैठक

Latest Marathi News Live Update: वसंत मोरेंचं लोकसभेचं निवडणूक चिन्ह ठरलं!

T20 World Cup 2024: केएल राहुल, सिराजला संधी नाही! वेस्ट इंडिजच्या दिग्गजाने निवडली टीम इंडिया, पाहा कोणाला दिली संधी

Gurucharan Singh Missing Update : 7000 रुपयांचा व्यवहार, लग्नाची तयारी अन् बेपत्ता झाल्याचं कारस्थान ? गुरुचरण यांच्याविषयी महत्त्वाची माहिती समोर

Kolhapur Politics: "इथं जिंकवण्यापेक्षा पाडायचे कोणाला हे पहिलं ठरतं"; इतिहास कोल्हापूरच्या राजकारणाचा

SCROLL FOR NEXT