उत्तर महाराष्ट्र

नंदूरबारमध्ये सकाळी बाजारपेठेत गर्दी अन्‌ दुपारनंतर शुकशुकाट 

धनराज माळी

नंदुरबार ः जिल्ह्यात गुरुवारपासून (ता. १) १५ दिवसाच्या लॉकडाउनच्या अंमलबजावणीस सुरूवात झाली आहे. मात्र भाजीपाला, फळे, दूध, रेस्‍टॉरंट, किराणा दुकानांना दुपारी एकपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिल्याने सकाळपासून दुपारी एकपर्यंत बाजारपेठेत गर्दी, तर दुपारनंतर मात्र शुकशुकाट होता. पोलिसांकडून शहरात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यांवर वाहनांची तपासणी केली जात होती. आज पहिला दिवस होता म्हणून लॉकडऊनच्या अंमलबजावणीची तीव्रता फारशी दिसून आली  नाही. 

जिल्ह्यात दिवसंदिवसे कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत पंधरा हजारावर नागरिकांना बाधा झाली आहे. तर तीनशेवर नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सध्या साधारण शासकीय नोंद नुसार सुमारे पाच हजा रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयासह खासगी रूग्णालयेही फुल्ल झाले आहेत. एवढ्या बिकट स्थितीला आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क करीत लॉकडाउनची परवानगी मागितली होती, त्यानुसार १ ते १५ एप्रिल असे १५ दिवस लॉकडाउन करण्यात आला आहे. त्यात काही राजकीय पक्ष व संघटनांच्या मागणीनुसार भाजीपाला, फळे, दूध, रेस्‍टॉरंट, किराणा दुकानांना दुपारी एकपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा दिली आहे.

चौका-चौकात पोलिस बंदोबस्त

आज पहिल्या दिवशी दुपारी एकपर्यंत बाजारपेठेत गर्दी होती. मात्र एकनंतर चौकाचौकांत केवळ पोलिस तैनात होते. सर्वत्र शुकशुकाट होता. शहरात येणाऱ्या मुख्य रस्त्यांवर बॅरिकेटस् लावण्यात आले आहे. तसेच वाहनांची तपासणी करून पुढे सोडले जात आहे. मास्क नसलेल्या वाहनधारकांवर कारवाई केली जात आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT