Sharad Pawar
Sharad Pawar 
उत्तर महाराष्ट्र

राष्ट्रवादी लोकसभा निवडणुकीचा फुंकणार बिगुल

सकाळवृत्तसेवा

नाशिक - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ३ आणि ४ मार्चला नाशिक दौऱ्यावर येत आहेत. त्यानिमित्ताने पक्षातर्फे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने नाशिक आणि दिंडोरी मतदारसंघाचा बिगुल फुंकला जाईल. येत्या ३ मार्चला दुपारी चारला चांदवड येथील चंद्रभागा लॉन्सवर, तर ४ मार्चला सकाळी साडेदहाला नाशिकमधील चोपडा लॉन्सवर श्री. पवार यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा होत आहे.

कार्यकर्ता मेळाव्यासाठी पवार यांच्यासमवेत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहतील. पवार यांच्या दौऱ्याच्या तयारीसाठी राष्ट्रवादी भवनात बुधवारी (ता. २७) जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांच्या अध्यक्षतेखाली विस्तारित कार्यकारिणीची बैठक झाली. शहराध्यक्ष रंजन ठाकरे, डॉ. भारती पवार, माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे, धनराज महाले, दिलीप बनकर, उत्तम भालेराव, माजी खासदार देवीदास पिंगळे, प्रदेश पदाधिकारी अर्जुन टिळे, माणिकराव शिंदे, राजेंद्र भोसले, 
संदीप गुळवे, जिल्हा परिषदेचे सभापती यतीन पगार, पुरुषोत्तम कडलग, विजय पवार, राजेंद्र जाधव, डॉ. योगेश गोसावी, राहुल सालगुडे, रामदास पाटील आदी उपस्थित होते.   

धनदांडग्यांचे सरकार
महागाई शंभर दिवसांत कमी करण्याचे आश्‍वासन देऊन सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. तरीही महागाई कमी झाली नाही. महागाई कमी करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. कामगार, सर्वसामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या विरोधातील धोरण राबविण्यात आले. त्यामुळे भाजप-शिवसेना युतीचे सरकार हे धनदांडग्यांचे आहे. युती सरकारने ‘अच्छे दिन’चे खोटे स्वप्न दाखविले, खोटी आश्‍वासने दिली, अशी टीका बैठकीत करण्यात आली.

हवाई दलाचे अभिनंदन
पाकव्याप्त काश्‍मीरमधील दहशतवादी तळ उद्‌ध्वस्त केल्याबद्दल भारतीय हवाई दलाच्या अभिनंदनाचा ठराव बैठकीत करण्यात आला सामान्यांबरोबर शेतमालाच्या कोसळलेल्या भावाप्रश्‍नी २ मार्चला विंचूर चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : राज्यात महाविकास आघाडीला ३० ते ३५ जागांवर विजय मिळेल; संजय राऊत यांचा दावा

Pakistan Team coach : मोठी बातमी! भारताला World Cup मिळवून देणारा गुरू बनला पाकिस्तानचा कोच, PCB ने दिले अपडेट

'काँग्रेसने दोनदा बाबासाहेबांचा पराभव केला, प्रकाश आंबेडकरांना सोडून दिलं'; बावनकुळेंचा जोरदार प्रहार

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : अभिनेता साहिल खानला दोन दिवसांची पोलीस कोठडी

SCROLL FOR NEXT