Shabari Loan Scheme : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी अल्प व्याजदरात २०२३-२४ या वर्षात कर्ज योजना राबविण्यात येत आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे शाखा व्यवस्थापक हि. न. पाटील यांनी दिली.
या योजनेत स्वयंसहाय्यता बचतगट, प्रवासी, मालवाहू वाहन व ऑटोरिक्षा व्यवसाय यासाठी कर्ज मंजूर करण्यात येणार आहेत. (Low Interest Loan Scheme for Educated Unemployed Scheduled Tribes nandurbar news)
योजनेसाठी तहसीलदार किंवा उपविभागीय अधिकारी यांचा जातीचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, ग्रामीण व शहरी भागासाठी तीन लाख रुपये मर्यादेत उत्पन्नाचा दाखला, व्यवसायासाठी लागणाऱ्या साहित्याचे दरपत्रक, व्यवसाय प्रकल्प अहवाल, बँक पासबुकची छायांकित प्रत, सातबारा, घर नमुना आठ, आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, तीन पासपोर्ट साइज फोटो, वाहन व्यवसायासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाची प्रचलित नियमानुसार आवश्यक कागदपत्रे, एक जामीनदार आदी कागदपत्रे अर्जासोबत सादर करणे बंधनकारक असेल.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
अर्ज भरण्यासाठी https://mahashabari.in/ या संकेतस्थळावर ऑनलाइन कर्ज वितरण प्रणालीद्वारे स्वत:चे खाते तयार करून, संपूर्ण माहिती व आवश्यक ती कागदपत्रे जोडावीत. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर त्याची मुद्रित प्रत कागदपत्रांसह शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या शाखा कार्यालयास ५ सप्टेंबर २०२३ पर्यंत जमा करावी, असेही श्री. पाटील यांनी कळविले आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.