Maharashtra Bandh Rally On Tahsil Office Dindori 
उत्तर महाराष्ट्र

Maratha Kranti Morcha : दिंडोरी येथे तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा 

सकाळवृत्तसेवा

लखमापूर (नाशिक) : मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने दिंडोरी येथे तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढत सरकारचा निषेध करत निवेदन देण्यात आले.

दिंडोरी नगरपंचायत येथील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करत बाजार पटांगण ते तहसील कार्यालय येथे मोर्चा काढण्यात आला. यावेळी एक मराठा लाख मराठा, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, जय जिजाऊ जय शिवराय आदी घोषणा देण्यात आल्या. तहसीलदार बाबासाहेब गाढवे, पोलिस निरीक्षक अनिलकुमार बोरसे यांना निवेदन देत मराठा क्रांती मोर्चात शहीद झालेल्या काकासाहेब शिंदे व देशाचे संरक्षण करताना शहीद झालेल्या कौतुभ राणे व त्यांचे सहकारी शहिद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, माजी नगराध्यक्ष प्रमोद देशमुख , सचिन देशमुख, सोमनाथ जाधव, विनोद देशमुख, मनोज ढिकले, नितीन देशमुख, किशोर देशमुख, सचिन जाधव, संतोष मुरकुटे, माधवराव साळुंखे, संगम देशमुख, प्रशांत मोगल, सुनील जाधव, गुलाब जाधव, टिल्लू शिंदे, निलेश पेलमहाले, शिवाजी पिंगळे, काका देशमुख, रवी घुले आदींसह मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिंडोरी पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बाजारपेठ बंद - दरम्यान आज पुकारलेल्या बंद दरम्यान शहरातील जवळपास सर्वच व्यावसायिकांनी आपली दुकाने स्फुर्तीने बंद ठेवली होती.

राज्य परिवहन महामंडळाने खबरदारी म्हणून बससेवा बंद ठेवल्याने दिंडोरी बस वाहतूक पूर्णपणे बंद होती. बसस्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती, शालेय विद्यार्थी व प्रवाशी यांचे हाल झाले यावेळी खाजगी प्रवासी वाहतूक सुरळीत सुरू होती.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

1500 हिंदू मुलींचं धर्मांतर करणारा छांगूर उर्फ पीर बाबा कसा झाला 300 कोटींचा मालक? ATS तपासातून धक्कादायक माहिती उघड

Latest Marathi News Updates : नाशिकमध्ये निरीक्षण गृहतून मुलगी बेपत्ता, सुरक्षा यंत्रणेवर उठले सवाल

Viral Video: लोकांनी ऊर्जामंत्र्यांना विचारले २४ तासांत फक्त ३ तास ​​वीज मिळते... मंत्री म्हणाले जय श्रीराम... व्हिडिओ व्हायरल

Pune Cyber Police : नवीन सायबर ठाण्यांच्या प्रस्तावास मंजुरी द्यावी : आमदार सिद्धार्थ शिरोळे

Tobacco Ban: तंबाखूच्या बेकायदेशी विक्रीवर आणणार प्रतिबंध; ‘वर्ल्ड ॲन्टी काउंटर फिटिंग डे’निमित्त ‘पीएमआय इन इंडिया’चा मनोदय

SCROLL FOR NEXT