उत्तर महाराष्ट्र

जळगाव ग्रामीण : सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील विजयी : Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा

जळगाव : सहकार राज्यमंत्री व शिवसेना उमेदवार गुलाबराव पाटील यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या उमेदवार पुष्पा महाजन यांच्यासह भाजपचे बंडखोर चंद्रशेखर अत्तरदे यांचे आव्हान होते. यात गुलाबराव पाटील 43 हजार मतांच्या आघाडीने विजयी झाले आहे. 
राज्यभरात सुरू असलेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया आज सकाळी आठपासून सुरू करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील पहिला निकाल लागला असून, जळगाव ग्रामीण या मतदार संघातून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील हे 43 हजार मतांनी विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. या मतदारसंघातील लढत खऱ्या अर्थाने गाजली ती भाजपच्या बंडखोरीने. भाजपचे चिन्ह व प्रचार साहित्याचा सर्रास उपयोग करत बंडखोर उमेदवार चंद्रशेखर अत्तरदेंनी प्रचार केला. त्यामुळे गुलाबराव पाटलांनी हा मुद्दा लावून धरत गिरीश महाजनांशी वाद घातला होता. या वादामुळे निवडणुकीच्या प्रचारात अधिक रंग भरला गेला. शिवाय लढत चुरशीची होवून निकाल गुलाबराव पाटील यांना कमी मताधिक्‍य मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली होती. परंतु यामध्ये गुलाबराव पाटील यांनी बाजी मारत बंडखोर उमेदवार अत्तरदे हे खुप पिछाडीवर राहिले. जळगाव ग्रामीण मतदार संघातील पुर्ण झालेल्या मतमोजणीनंतर गुलाबराव पाटील यांना 88 हजार 609 प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे यांना 48 हजार 272 मते मिळवून दुसऱ्या क्रमांकावर आहे. राष्ट्रवादीच्या उमेदवार पुष्पा महाजन यांची मतसंख्या आतापर्यंत 14 हजार 327 एवढीच आहे. यामुळे जळगाव ग्रामीणवर शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखत जागा काबीज केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : धैर्यशील माने-सत्यजित पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये धुमश्चक्री

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Latest Marathi News Live Update: अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामीन याचिकेवर सुनावनी सुरू; थोड्याच वेळात फैसला

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT