उत्तर महाराष्ट्र

व्यापाऱ्यांचा बाजार समिती प्रशासनाला ठेंगा

सकाळवृत्तसेवा

मालेगाव- बाजार समितीच्या मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्रावरील व्यापाऱ्यांनी समितीला चार महिन्यांपासून बाजार शुल्क अदा केलेले नाही. बाजार शुल्कापोटी व्यापाऱ्यांकडे समितीची सुमारे ७० लाखांहून अधिक थकबाकी आहे. ही थकबाकी अदा करण्याबाबत वारंवार नोटीस देऊनही व्यापारी प्रतिसाद देत नाहीत. व्यापाऱ्यांनी कटू प्रसंग टाळण्यासाठी समितीला बाजार शुल्क लवकरात लवकर अदा करावे, अशी अपेक्षा समितीचे सभापती प्रसाद हिरे यांनी व्यक्त केली. बाजार शुल्क वेळवर न मिळाल्यास या केंद्राबाबत विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. 

मुंगसे येथील कांदा खरेदी-विक्री केंद्रासाठी समितीने महामार्गालगत तीन वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे २४ एकर जागा भाडेतत्त्वावर कराराने घेतली आहे. समितीला या केंद्रातून दरमहा २० लाखांहून अधिक बाजार शुल्क मिळते. या जागेच्या भाडेकरारापोटी समितीला वर्षाला सुमारे आठ लाख रुपये भाडे अदा करावे लागते. समितीने येथे व्यापाऱ्यांना शेड, पाणी, लाइट यांसह विविध सोयी-सुविधा पुरविल्या आहेत, असे समितीचे सचिव अशोक देसले यांनी ‘सकाळ’ला सांगितले. याउलट समिती आवारात कुठल्याही सोयी-सुविधा मिळत नसल्याने शुल्क अदा केलेले नाही, असे येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. 

येथील केंद्रावर ६० पेक्षा अधिक अडत व खरेदीदार नोंदणी केलेले व्यापारी आहेत. यातील सुमारे ३६ व्यापारी नियमित माल खरेदी करतात. त्यांच्यासह सर्वच व्यापाऱ्यांनी बाजार शुल्क अदा केलेले नाही. समितीने थकबाकी असलेल्या व्यापाऱ्यांना वैयक्तिक व असोसिएशनलादेखील शुल्क अदा करण्याबाबत पत्र दिले आहे. थकबाकी अदा न केल्यास कारवाईचा इशारा यात देण्यात आला आहे. 

जागा खरेदीसाठी शुल्क संचित
मुंगसे कांदा खरेदी-विक्री केंद्राला उपबाजार आवाराचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करा. या केंद्रावर सुविधांचा अभाव आहे. व्यापारी व शेतकरी बांधवांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून द्या. ही मागणी आम्ही वर्षानुवर्षे करीत आहोत. २००९ पासून हे केंद्र सुरू आहे. बाजार शुल्कापोटी आजवर कोट्यवधी रुपये भरले. शुल्क देणार नाही, असे आम्ही कधीही म्हटले नाही. शुल्क आमच्याकडे संचित आहे. उपकेंद्राच्या दर्जासाठी समितीची स्वमालकीची किमान दोन ते पाच एकर जागा हवी. या जागेसाठी प्रयत्न करा. आम्ही क्षणात शुल्क अदा करू. जागा खरेदीसाठी हे शुल्क संचित ठेवले आहे, असे मुंगसे कांदा व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र कापडणेकर यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

MI vs KKR Live IPL 2024 : अय्यरची 70 धावांची खेळी, मुंबईसमोर विजयासाठी 170 धावांच आव्हान

SSC-HSC Result 2024 : सीबीएसईचा दहावी-बारावीचा निकाल २० मे नंतर होणार जाहीर

West Indies T20 WC 24 Squad : विंडीजच्या संघात सगळे स्टार मात्र इन फॉर्म जादूगारच मिसिंग

SCROLL FOR NEXT