Ganeshotsav 2023  esakal
उत्तर महाराष्ट्र

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवासाठी अनेक मंडळांतर्फे समिती स्थापन करण्याची लगबग

सकाळ वृत्तसेवा

Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवाला दोन आठवडे शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात उत्सवासाठी विविध गणेशमंडळांतर्फे समिती स्थापन करण्याची लगबग सुरू आहे. गणेशोत्सवावर महागाई व अत्यल्प पावसामुळे दुष्काळाचे सावट आहे. तरीही गणेशभक्तांचा उत्साह कमी झालेला नाही. शहरात गल्लोगल्ली व हद्दवाढीतील गावांत गणेशोत्सवासाठी समिती स्थापन करण्यात येत आहे.

श्री गणरायाचे आगमन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. (Many mandals are about to form committee for Ganeshotsav dhule news)

त्यामुळे सर्वत्र गणरायाच्या आगमनाची तयारी सुरू झाली आहे. ‘श्री’च्या मूर्तींची मिरवणूक हा प्रत्येक मंडळातील युवकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो.

त्यामुळेच शहर आणि परिसरात लेझीमपथक व ढोलपथकांनी सराव सुरू केला आहे. यंदाचा गणेशोत्सव १९ सप्टेंबरला आहे. त्यामुळे विविध सार्वजनिक मंडळांची तयारी जोमाने सुरू आहे. मूर्ती ठरवण्यापासून ते विसर्जनापर्यंत युवक वर्गामध्ये नियोजन सुरू आहे.

सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतर डॉल्बीचा दणदणाट कमी झाला आहे. त्यानंतर पारंपरिक ढोल आणि ताशाला मार्केट आले आहे. शहर व परिसरात ढोल, बॅड, बँजो, ग्रामीण वाजंत्री, लेझीम यांसारखी वाद्ये मिरवणुकीत भाव खात आहेत. शहरात आता पारंपरिक ढोलपथके तयार झाली आहेत. यामध्ये महिलांचे ढोलपथकही आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ढोलपथकामध्ये शंभर ते दीडशे जणांचा सहभाग असतो. पारंपरिक वाद्याची आवड अनेक जण या सरावांमध्ये सहभागी होतात. विसर्जन मिरवणुकीला ऑर्डर मिळविण्यासाठी प्रमुखांची धडपड सुरू आहे. तसेच पथकातील कार्यकर्त्यांचा सराव सुरू झाला आहे.

सराव करण्यात अडचणी

लेझीमपथक, झांजपथक तसेच अन्य काही वाद्यांची पथके असतात. मात्र, त्यांना किमान १५ ते २० दिवस अगोदर सराव करावा लागतो. नंतर मुख्य वर्दीमध्ये वाद्यपथके सामील होत असतात. सध्या वेळ कमी असल्याने वाद्य वाजविण्यासाठी हौशी मुलेही उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सरावासाठी अडचणी येत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Crime: शहर हादरलं! एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह घरात आढळले; मृत्यू कशामुळे?

Mumbai News: डोंबिवलीत रस्त्यांची चाळण! नागरिकांचा संताप, प्रशासनाविरोधात रिक्षाचालकांचा ठिय्या

Nashik News : पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा: सातपूर-अंबड MIDC मधील खड्डेमय रस्ते; कामगार आणि उद्योजक त्रस्त

मराठी बोलणार नाही म्हणणाऱ्या केडियांनी मागितली माफी, चूक सुधारणार म्हणत राज ठाकरेंना केली नम्र विनंती; पाहा VIDEO

मराठीसाठी सत्तेवर लाथ, Raj Thackeray यांनी सांगितला 'तो' प्रसंग । Uddhav Thackeray । Raj Thackeray

SCROLL FOR NEXT