oxygen cylinder 
उत्तर महाराष्ट्र

ऑक्सिजन नसल्याने रुग्णांची वाताहत; १०० ऑक्सिजनयुक्त बेडची निर्मिती कुचकामी 

विजयसिंग गिरासे

चिमठाणे (धुळे) : जिल्हाधिकारी संजय यादव यांनी शिंदखेडा तालुक्यात कोरोना व्हायरस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने दोंडाईचा व शिंदखेडा येथील कोविड केअर सेंटर येथे प्रत्येकी ५० ऑक्सिजनयुक्त बेडची निर्मितीचे आदेश २० मार्चला दोंडाईचा दौऱ्यावर असताना दिले होते. दोंडाईचा व शिंदखेडा येथील कोविड केअर सेंटर येथे ऑक्सिजन बेडची तयारी पूर्ण झाली असून ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. 
दोंडाईचा व शिंदखेडा येथील कोविड केअर सेंटर येथे प्रत्येकी ५० ऑक्सिजनयुक्त बेड निर्मितीच्या सूचना जिल्हाधिकारी संजय यादव यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. नागरिकांनी ‘कोविड- १९’ ची लक्षणे दिसताच जवळच्या रुग्णालयात तपासणी करून शासकीय कोविड केअर सेंटरमध्ये दाखल व्हावे, असे आवाहन शिरपूर उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल यांनी केले आहे. शिंदखेडा तालुक्यात चिमठाणे, निमगुळ, धमाणे, मालपूर, धमाणे व आता शिंदखेडा शहर कोरोना हॉटस्पॉट झाल्याने जिल्हाधिकारी यादव हे २० मार्चला दोंडाईचा येथे दौऱ्यावर असताना १०० ऑक्सिजन बेड मंजूर केले आहेत. दोंडाईचा व शिंदखेडा येथील कोविड केअर सेंटर येथे ऑक्सिजनयुक्त बेडची तयारी पूर्ण झाली असून सिलिंडर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत. 

शिल्‍लक सिलेंडर दिल्‍यास वाताहत थांबणार
दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांच्या हेकेखोरपणामुळे रुग्णांचे हाल होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे १४० ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध असून सुमारे ८८ रुग्णांना ऑक्सिजनयुक्त सुविधा देण्यात येत आहेत. शिल्लक सिलिंडर हे दोंडाईचा व शिंदखेडा येथील कोविड केअर सेंटरला उपलब्ध करून दिले तर काही रुग्णांची वाताहत थांबणार आहे. शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी उशिरा का होईना कोरोना रॅपीड चाचणीला सुरवात झाल्याने शहरासह परिसरातील गावातील रुग्णाची सोय झाली असून पॉझिटिव्ह रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. 
 
दोंडाईचा व शिंदखेडा येथील कोविड केअर सेंटरसाठी १०० ऑक्सिजनयुक्त बेडचे कामपूर्ण झाले. पण ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोंडाईचा येथील कोविड केअर सेंटरसाठी दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयाकडून काही प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. 
- डॉ. विक्रमसिंह बांदल, उपविभागीय अधिकारी, शिरपूर. 
 
शिंदखेडा व दोंडाईचा येथील कोविड केअर सेंटर येथे ऑक्सिजनयुक्त प्रत्येकी ५० बेड मंजूर झाले आहेत. ऑक्सिजन सिलिंडरचा वरून तुटवडा असल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. लवकरच ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होतील. दोंडाईचा कोविड केअर सेंटर येथे सुमारे ७० व शिंदखेडा येथील कोविड केअर सेंटर येथे सुमारे २५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 
- डॉ. हितेंद्रसिंह देशमुख, निवासी वैद्यकीय अधिकारी, दोंडाईचा व शिंदखेडा कोविड केअर सेंटर. 

संपादन- राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Record: साई सुदर्शनचा विश्वविक्रम! IPL 2026 मध्ये ऑरेंज कॅपही मिळवली अन् T20 मध्ये भल्याभल्यांना जे जमलं नाही, ते करून दाखवलं

KKR vs GT, IPL Points Table: शुभमन गिलचं शतक हुकलं अन् कोलकाताने रोखला गुजरातचा विजयरथ! KKR चं प्लेऑफचं आव्हान जिवंत

NEET पेपर लीकनंतर NTAमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती; सरकारचं निर्णायक पाऊल

१० संघ अन् १३ शतकं... IPL च्या १९ वर्षांच्या इतिहासात याआधी जे कधीच घडलं नव्हतं ते यंदा घडलंय!

केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला पोक्सो अंतर्गत दाखल गुन्ह्यात अटक; १७ वर्षीय मुलीला लग्नाचं आमिष दाखवून ठेवले संबंध

SCROLL FOR NEXT