rte
rte 
उत्तर महाराष्ट्र

आरटीई प्रवेशासाठी हवीय आणखी मुदत

सकाळवृत्तसेवा

धुळे : शिक्षण हक्क कायद्यानुसार दुर्बल व वंचित घटकातील पाल्यांना इंग्रजी माध्यमातील शाळांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत २१ मार्चपर्यंत आहे. शासनाच्या या योजनेचा जास्तीत जास्त दुर्बल व वंचित घटकातील पालकांनी घ्यावा असे आवाहन युवासेनेतर्फे करण्यात आले आहे. 
 
इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरतांना पालकांचे जिथे राहते घर असेल तेथुन एक किलोमीटर अंतरावरील इंग्रजी माध्यमांच्या शाळांची नावे ऑप्शन म्हणुन समोर येतील. जर पालकांना शाळा पसंत नसेल तर पुढे तीन किलोमीटर अंतरावरील शाळांचा पर्याय समोर येतो. यानंतर मात्र किलोमीटरचे बंधन राहत नाही. यामध्ये पालक यादीमध्ये दिलेल्या इंग्लिश मिडीयम शाळेंच्या नावांपैकी कोणतेही नाव ऑप्शनमध्ये निवडू शकतात. अर्ज भरल्यानंतर काही दिवसांनी मोबाईलवर पाल्याचा प्रवेश कोणत्या शाळेमध्ये झाला आहे याबाबत संदेश येतो. त्यानंतर पालकांनी संबंधित शाळेत जाऊन प्रवेशप्रक्रिया पुर्ण करुन घ्यावी. यासाठी पैशांची आवश्यकता नाही. 

अडचणी असल्‍यास संपर्क साधा
प्रवेश अर्ज भरण्यासाठी पालकांनी student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मुदतीत अर्ज करावा. शिक्षण विभागाने धुळे शहरातील पालकांसाठी धुळे महानगरपालिका शिक्षण मंडळ येथे तसेच इतर ठिकाणच्या पालकांसाठी चारही तालुक्यातील पंचायत समिती येथील गटसाधन केंद्र येथे फॉर्म भरण्याची व्यवस्था आहे. अर्ज प्रक्रीयाबाबत काही अडचणी असल्यास शिवसेना कार्यालय (भगवा चौक, धुळे) येथे संपर्क साधावा असे आव्हान युवासेना जिल्हाप्रमुख ॲड. पंकज गोरे (९९२३९१०००३) यांनी केले आहे. 
 
ही कागदपत्र आवश्‍यक 
जन्माचे प्रमाणपत्र, वास्तव्याचा पुरावा (भाडे तत्वावर राहणार्‍या पालकांसाठी दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनाम्याची प्रत आवश्यक), पालकांचा जातीचा दाखला (अनुसुचित जाती व जमाती), पालकांचा उत्पन्नाचा दाखला (उत्पन्न एक लाखा पेक्षा कमी असावे), दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ४० टक्केपेक्षा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र (ऑनलाईन जिल्हा शल्यचिकित्सक किंवा मेडीकल बोर्ड). 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT