marriage
marriage 
उत्तर महाराष्ट्र

विवाह सोहळ्यात आहेर नव्‍हे तर वाटले जमात दाखले 

एल. बी. चौधरी

सोनगीर (धुळे) : गेल्या २० ते २५ वर्षांपासून लग्नसमारंभ हा पवित्र सोहळा धागडधिंगा, हुंडा, मानपान, खर्चिक थाटमाट यांनीच भरलेला दिसतो. प्रत्येक समाज आपल्या मूळ चालीरीती विसरले आहेत. या पार्श्वभूमीवर वालखेडा (ता. शिंदखेडा) येथील सैनिकरत्न पुरस्कारप्राप्त आप्पासाहेब येळवे यांनी मुलगी गायत्रीच्या विवाहात वरील सर्व प्रकारांना फाटा देत आदिवासी टोकरे कोळी समाजातील विस्मृतीत गेलेल्या मूळ चालीरीतींना जिवंत करीत एक आगळावेगळा विवाह सोहळा केला. 
भुरेश ईशी यांचा मुलगा पंकज यांच्याशी गायत्रीचा विवाह तिरंगा हाउस, वालखेडा येथे आदिवासी टोकरे कोळीच्या बंद पडलेल्या जुन्या चालीरीती, रुढी परंपरेनुसार झाला. लग्नात धेडगा नृत्य म्हणजेच झाल नाचणे, तारपा नृत्य, सिपली नृत्य, लेझीम नृत्य करण्यात आले. तारपा नावाची पुंगी विशिष्ट पद्धतीने सुरात वाजवून, आदिवासी कुलदैवतांना, टोकरापासून बनवलेल्या टोपलीत ठेवून पारंपरिक पद्धतीने नृत्य झाले. तारपाचा तालावरील धेडगा नृत्य व झाल नृत्य पाहताना लोक भान विसरून गेले. लग्नाचे वैशिष्ट्य म्हणजे हुंडा, साखरपुडा, नारळ, वाट्या लावणे या अनिष्ट प्रथा बंद केल्या. हा विवाह आप्पासाहेब येळवे व आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मोतीलाल सोनवणे यांनी घडवून आणला. 

दाखल्‍यांचे वाटप
विवाह सोहळ्यात आदिवासी कोळी ढोर किंवा टोकरे कोळीचे तेरा अनुसूचित जमातीचे दाखले वाटले. विवाहास वंचित बहुजन आघाडीचे नेते, मार्गदर्शक ॲड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर, भय्यासाहेब पारेराव, जिल्हाध्यक्ष चक्षुपाल बोरसे, योगेश जगताप, महासचिव नितीन भाऊ, उपाध्यक्ष विजय पाटील, नंदुरबार जिल्हा नेते आनंदा कोळी, जिल्हाध्यक्ष काशिनाथ शिरसाठ, आदिवासी विकास संघाचे सल्लागार ॲड. गणेश सोनवणे, ॲड. बळिराम वाघ, अध्यक्ष संजय दावळे, संदीप तवर, नितीन बोरसे, जळगाव जिल्हाध्यक्ष सागर सोनवणे, धुळे जिल्हा संपर्कप्रमुख साहेबराव वाकडे, आदिवासी टोकरे कोळी युवा मंच संदीप सोनवणे, महेश सावळे आदी उपस्थित होते. 

संपादन ः राजेश सोनवणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला उडणार सोने खरेदीला झुंबड, पण सोनं खरं की भेसळयुक्त असं करा चेक!

Lok Sabha Election : नाशिकमधून मोठी बातमी! शांतिगिरी महाराजांचा अर्ज बाद पण...; दिंडोरीमधूनही 5 अर्ज बाद

Adhyayan Suman : बेरोजगारी आणि आलेलं नैराश्य; हिरामंडीतील अभिनेता म्हणाला,"व्यसनाच्या आहारी जाणार होतो पण..."

SCROLL FOR NEXT