crime 
उत्तर महाराष्ट्र

मद्यधुंद महिलेचा रस्‍त्‍यावर धिंगाणा..अन्‌ पकडली पोलिसाची कॉलर; व्हिडीओ क्‍लीप व्हायरल

विजयसिंग गिरासे

चिमठाणे (धुळे) : मुंबई- आग्रा महामार्गावरील नरडाणा (ता. शिंदखेडा) येथील जुन्या टोलनाक्याजवळ रविवारी (ता.१५) सायंकाळी महामार्गावर ४० वर्षीय विवाहित व तिच्याबरोबर असलेल्‍या नात्यांने दीर असलेल्या ३१ वर्षीय तरूण हे दारु पिवून धिंगाणा घालत होते. 

दोघांनी पोलिस उपनिरीक्षक, महिला व पुरुष पोलिस कर्मचारी यांच्या अंगावरील शासकीय गणवेशाची कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याचा व्हीडीओ क्लीप वायरल झाली. याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित यांनी गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेत महिलेला तीच्या पतीच्या ताब्यात देण्यात आले. 

रस्‍त्‍यावर वाहन धारकांना देत होते त्रास
नरडाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरिक्षक मनोज ठाकरे यांना माहिती मिळाली की, जुन्या टोल नाक्याजवळ महामार्गावर विवाहित तरूणी व एक तरूण दारूच्या नशेत रस्त्याच्या मध्ये आडवे होवून वाहन धारकांना त्रास देत आहे. ही माहिती मिळाल्‍यानंतर नरडाणा येथील जुने टोलनाक्यापासून जवळच हॉटेल शितलच्या पुढे अलका किशोर पाटील (वय 40, रा. डोंगरे महाराजनगर धुळे) आणि हातनूर (ता.शिंदखेडा) महादेव पेट्रोल पंपाचा मॅनेजर भूषण ज्ञानेश्वर पाटील (वय 31) हे दोघे रविवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास गोंधळ घालत होते.

शिवीगाळ करत केली धक्‍काबुक्‍की
नरडाणा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक शरद पाटील, महिला व पुरुष कर्मचाऱ्यांनी त्यांना थांबवून विचारपूस केली. त्यावेळेस त्या महिलेसह पुरुषाने शिवीगाळ करीत रस्त्यावर धाव घेतली. पोलिसांनी रोखले असता थेट त्यांची कॉलर पकडून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्या नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले महिलेला पती किशोर पाटील यांच्या ताब्यात दिले. दोघांविरोधात नरडाणा पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा, पोलिसांना धक्काबुक्की करणे व सार्वजनिक जागी दारू पिऊन शांततेचा भंग करणे आदी कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक निरिक्षक मनोज ठाकरे करीत आहेत. 

संपादन ः राजेश सोनवणे
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TV Advertising Rules: टीव्हीवर आता जास्त जाहिराती दिसणार? केंद्र सरकारने २० वर्षांचा नियम हटवला; दर्शकांवर काय परिणाम होणार?

CM Vijay Trisha Viral News : चेन्नईत काय घडलं? थलपती विजय यांना पाहताच अभिनेत्री त्रिशानं मारला कडक सॅल्यूट; तिच्या पिवळ्या साडीतील लूकनंही वेधलं लक्ष

तब्बल १० वर्ष सोनाली कुलकर्णीसोबत बोलत नव्हता सिद्धार्थ जाधव; कारण सांगत अभिनेत्री म्हणाली, 'जेव्हा श्रीदेवींचं निधन झालं...'

Marathi News Live Updates : सर्वांमध्ये एकता, देशाबद्दल प्रेम आणि सद्भावना असायला हवी - रितू तावडे

स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमाला निघालेल्या मुली, ट्रॅव्हल्सने दुचाकीला धडक दिल्यानं ३ मैत्रिणींचा मृत्यू

SCROLL FOR NEXT