vaccination center
vaccination center vaccination center
उत्तर महाराष्ट्र

स्‍थानिक नव्‍हे; बाहेरच्‍यांचीच गर्दी..नरडाणा येथील लसीकरण युवकांकडून बंद

राजेश सोनवणे

सोनगीर (धुळे) : नरडाणा (ता.शिंदखेडा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू असून लसीकरणात स्थानिकांऐवजी बाहेरील लोकांचीच गर्दी होते. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ लसीकरणापासून वंचित राहात आहेत. या पार्श्‍वभूमीवर स्थानिकांना लसीकरणात प्राधान्य देण्याच्या मागणीसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रातील लसीकरण नरडाणा युवकांनी शनिवारी (ता.८) बंद केले.

नरडाणा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरूवात झाली. परंतु केवळ ५ टक्के स्थानिक तर ९५ टक्के बाहेरील व्यक्तींना लस मिळते, असे दिसून आले. ऑनलाईन बुकिंग अवघ्या काही मिनिटात बंद होते. परिणामी स्थानिकांना गावात लसीकरण होत असूनही बाहेरगावी मिळेल त्या वाहनाने लस घेण्यासाठी जावे लागते. ही खर्चिक बाब लक्षात घेता ७० टक्के स्थानिकांना ३० टक्के इतरांना लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी युवकांनी केल्याने सकाळी नरडाणा प्राथमिक केंद्रात गोंधळ झाला व लसीकरण केंद्र बंद करण्यात आले.

सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज ठाकरे यांनी मध्यस्थी करून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. भूषण मोरे, नरडाणा वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल पाटील यांच्याशी चर्चा केली. यावेळी युवकांनी निवेदनही दिले. निवेदनावर महेंद्र शिसोदे, राजेश शिसोदे, योगेश शिसोदे, पंकज शिसोदे, आर. ओ. पाटील, संदीप शिसोदे, आनंदा पाटील, रोहित शिसोदे, विक्की बाफना आदींच्या सह्या आहेत. वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांच्या सुचनेने सोमवार (ता.१०) पासून लसीकरणाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT