Welcoming the birth of a daughter Welcoming the birth of a daughter
उत्तर महाराष्ट्र

मुलगी झाली हो..म्‍हणून त्‍यांनी काय काय केले!

मुलगी झाली हो..म्‍हणून त्‍यांनी काय काय केले!

सकाळ डिजिटल टीम

शिंदखेडा (धुळे) : घराच्या दरवाजासमोर अत्यंत आकर्षक अशा विविधरंगी फुग्यांचे प्रवेशद्वार.. प्रवेशाच्या मार्गावर टाकलेल्या विविध फुलांच्या पाकळ्या.. आजूबाजूला लावलेल्या पणत्या, अत्यंत आकर्षक पद्धतीने सजविलेले घर आणि सोबत सनईचे सुमंगल सूर. हे चित्र आहे एका नवजात चिमुकलीच्या (birth of a daughter) जंगी स्वागताचे. पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीजन्माचे एवढे जंगी स्वागत अलीकडे होत नाही. मात्र धुळ्यातील नरेंद्र शिवाजीराव पवार यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे. (Welcoming the birth of a daughter)

नरेंद्र पवार यांचा मुलगा प्रतीक यांचा विवाह शिंदखेडा येथील प्रा. सतीश पाटील यांची मुलगी नेहा यांच्याशी वर्षापूर्वी झाला. नुकतेच त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. मुलगी झाली म्हटले, की अनेकांच्या कपाळावर आठ्या येतात. बोटे मोडली जातात. त्या मुलीस नकोशी म्हटले जाते. सुनेला त्रास दिला जातो. मुलीची हेळसांड होते. मात्र येथे चित्र उलटेच आहे. मुलगी झाल्याचा आनंद दोन्ही कुटुंबांतील सदस्यांनी मनापासून खुल्या मनाने व्यक्त केला. दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना पेढे भरवले. विशेष म्हणजे नवजात कन्येचे वडील, आजी, आजोबा यांनी तर नवे कपडे परिधान करून कॉलनीतील शेजारच्यांना पेढ्यांचे वाटप केले.

स्‍वागतासाठी आजी- आजोंबांनी केली तयारी

नवी चिमुकली लक्ष्मीच्या रूपात आली असे आनंदाने ते फोनवरून नातलगांना सांगत आहेत. चार दिवसांनी बाळ-बाळंतिणीला दवाखान्यातून घरी सोडले. आजी आजोबांना तर आकाश ठेंगणे झाले. त्यांनी चिमुकलीच्या स्वागताची जय्यत तयारी केली. फुग्यांचे प्रवेशद्वार लावत पुष्पवृष्टी करून औक्षण केले. चिमुकलीच्या पायांचे ठसे घेण्यात आले. घर सजविले. नातेवाइकांना स्वागतासाठी बोलावत घरात गोडधोड स्वयंपाक केला.

चमकणारी चांदणी म्‍हणून ‘यामी’

चिमुकलीसाठी आकर्षक पाळणा बांधत चमकणारी चांदणी असा अर्थ असलेले ‘यामी’ हे नामकरणही केले. यामीच्या येण्याने सारे घर हसायला लागले, सारे घर खेळायला लागले. सारे घर बोबडे बोलायला लागले. सारे घर आनंदाने नाचू लागले. यामीचे लाड सारे घरच करू लागले आहे. मुलाच्या हव्यासापायी सुनेला छळणाऱ्या आणि नवजात चिमुकलीची हेळसांड करणाऱ्या कुटुंबासमोर हा एक आदर्श निर्माण झाला आहे. पवार कुटुंबाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मुलगा आणि मुलगी असा भेद आमचे कुटुंब कधीच करत नाही. मुलीला तर लक्ष्मीचे रूप मानणारे आमचे कुटुंब आहे. आमच्या कुटुंबात सून म्हणून आलेली मुलगी आणि आता नात म्हणून आलेली चिमुकली यांना आम्ही लक्ष्मीचेच रूप मानतो.

- नरेंद्र पवार (धुळे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT