Crop insurance Crop insurance
उत्तर महाराष्ट्र

फळ पीकविमा योजनेच्या निकषात सुधारणा

फळ पीकविमा योजनेच्या निकषात सुधारणा

सकाळ डिजिटल टीम

शिरपूर (धुळे) : पंतप्रधान फळ पीक योजनेचा (Crop insurance) लाभ देताना विमा कंपन्यांद्वारे लावले जाणारे निकष आणि हवामान धोके यात राज्य शासनाने महत्त्वाच्या सुधारणा केल्या असून, त्याचा लाभ राज्यातील लाखो फळ पीक उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार आहे. या सुधारणांसाठी माजी मंत्री (MLA Amrish patel) आमदार अमरिशभाई पटेल, आमदार कांशीराम पावरा व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. (shirpur-mla-amrishbhai-patel-farmer-crop-inshurance)

विविध आपत्तीमुळे नुकसान झालेल्या फळ पिकांचा विमा अदा करताना अद्ययावतीकरण आणि बदलत्या वातावरणाचा अभ्यास यांच्या अभावामुळे शेतकऱ्यांचे दावे नाकारले जाऊन संबंधित विमा कंपनीला संपूर्ण फायदा मिळत असल्याच्या घटना वाढल्या होत्या. आमदार पटेल, आमदार पावरा व भूपेशभाई पटेल यांनी फळ पीकविमा योजनेतील जाचक अटी-निकष आणि हवामान धोके यांच्यात बदल करावा, अशी मागणी करून शासनाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या सूचनेवरून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष के. डी. पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात यासंदर्भात जनहित याचिकाही दाखल केली असून, विधिज्ञ ॲड. ज्ञानेश्वर बागूल काम पाहत आहेत. याचिकेवरून संबंधित विमा कंपनीसह प्रतिवादींना नोटीसही बजावली आहे. याचिकेचा निकाल प्रलंबित आहे.

शासनाने जाहीर केलेल्या निकषांची पडताळणी के. डी. पाटील, नरेंद्रसिंग सिसोदिया, प्रकाश गुजर (घोडसगाव), जे. टी. पाटील (भाटपुरा), ॲड. प्रताप पाटील, योगेश बोरसे, अविनाश गुजर, अविनाश पाटील, दर्यावसिंग जाधव, हुकूमचंद पाटील आदींनी करून सुधारण्यासाठी उपयुक्त सूचना केल्या.

सुधारित निकष असे

आमदार पटेल, आमदार पावरा व भूपेशभाई पटेल यांनी केलेल्या मागणीनुसार राज्य शासनाने २०२१- २२, २०२२- २३ व २०२३- २४ या तीन वर्षांसाठी फळ पीकविमा योजनेचे सुधारित निकष जाहीर केले. केळी प्रमुख फळ पीक असलेल्या २७ जिल्ह्यांत अंबिया बहारात हवामान धोक्यांचे सुधारित निकष आणि नुकसानभरपाईची तरतूद अशी : १ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारीदरम्यान सलग तीन दिवस किमान तापमान आठ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास कमाल २६ हजार ५०० रुपये, १ मार्च ते ३१ जुलैदरम्यान ४० किलोमीटर प्रतितास किंवा त्यापेक्षा अधिक वेगाने वारे वाहिल्याची नोंद संबंधित हवामान केंद्रात झाल्यास कमाल ७० हजार रुपये, १ एप्रिल ते ३० एप्रिलदरम्यान सलग पाच दिवस ४२ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक तापमान राहिल्यास ३५ हजार रुपये, १ मे ते ३१ मेदरम्यान सतत पाच दिवस ४५ अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा अधिक तापमान राहिल्यास ४३ हजार ५०० रुपये नुकसानभरपाई देय असेल, १ जानेवारी ते ३० एप्रिलदरम्यान गारपीट झाल्यास संबंधित विमाधारकाला ४६ हजार ६६७ रुपये नुकसानभरपाई देय असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Agricultural News : सरकारी धोरणानं कांदा उत्पादकांना रडवलं, भारताच्या निर्यात महसुलात ११०० कोटींची घट; बांगलादेश-पाकिस्तानने साधली संधी

T20 World Cup: झिम्बाब्वेविरुद्धच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाने केला मोठा बदल; मॅच विनर खेळाडू संघात सामील

T20 WC, IND vs PAK: जावई असला म्हणून काय झालं? भारताविरुद्धच्या पराभवानंतर आफ्रिदी चिडला, थेट तिघांच्या हकालपट्टीची मागणी

Latest Marathi News Update : महाशिवरात्रीला बोकड कापल्याने ग्रामस्थ आक्रमक, जालना महामार्गावर ठिय्या आंदोलन; २ तास वाहतुकीचा खोंळबा

Satara : गुरुजी हे वागणं बरं नव्हं! 'व्हॅलेंटाइन डे'ला विद्यार्थीनीलाच प्रपोज; वर्गातून बाहेर बोलवत पकडला हात

SCROLL FOR NEXT