farmer onion farmer onion
उत्तर महाराष्ट्र

वादळी वाऱ्यामुळे कांदा चाळ उद्‌ध्‍वस्‍त; काढलेला कांदा सांभाळण्याचे संकट

वादळी वाऱ्यामुळे कांदा चाळ उद्‌ध्‍वस्‍त; काढलेला कांदा सांभाळण्याचे संकट

सकाळ डिजिटल टीम

नेर (धुळे) : दोन दिवसापूर्वी नेर येथे सायंकाळी वादळी वाऱ्यामुळे येथील शेतकऱ्यांची मोठी फजिती झाली. या नुकसानग्रस्त वादळामुळे भदाणे शिवारातील गण्यादेव येथे शेतकरी गणेश मोतीराम माळी (खलाणे) यांची पन्नास फुटी चाळ नवीन तयार केलेली होती. त्‍यात दिवसभर कांदा भरला होता. परंतु सायंकाळी आलेल्या वादळामुळे चाळीची जाळी आणि ताडपत्री उडून गेली. यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.

शेतातील पिकविलेला कांदा दिवसभर त्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने मजूर लावून भदाणे शिवारात कांदा चाळ असलेल्या ठिकाणी वाहतूक केला होता. त्याच दिवशी दिवसभर कष्ट करून तेथील संपूर्ण कांदा हा चाळीत साठवणुकीसाठी भरून ठेवला. कांदा लागवडीपासून ते काढणीपर्यंतच्या कालावधीत मोठा खर्च लागल्यामुळे सध्या कांद्याला खर्चापेक्षा कमी भाव असल्याने कांद्याने शेतकऱ्याला रडवले आहे. या अनुषंगाने थोड्या दिवसात कांद्याला थोड्या प्रमाणात भाव वाढेल या अपेक्षेने शेतकरी गणेश माळी यांनी या कांद्याची साठवणूक केली होती. परंतु त्याच दिवशी सायंकाळी मात्र निसर्गाने फार मोठी थट्टा केली. यामुळे गणेश माळी यांचे फार मोठे नुकसान झाले.

कांदाही बाहेर उडाला

वादळी वारा जोराचा असल्यामुळे नवीन बांधलेली कांदा चाळ यावरील ताडपत्री तसेच चाळीला बसविलेले लोखंडी अँगल, जाळी हे सर्व वादळामुळे उडून गेल्याने चाळीत भरलेला कांदा हा संपूर्ण बाहेर फेकला गेला. चाळ भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक खर्च, मजुरी लागली होती परंतु वादळी वाऱ्यामुळे तेथील शेतकऱ्याचे फार मोठे नुकसान झाले. यासाठी शेतकरी गणेश माळी यांनी प्रशासनाला विनंती करून येथील तलाठी यांनी तात्काळ झालेल्या नुकसानीचा पंचनामा करावा अशी मागणी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

Milk Rate : पुणे जिल्हा दूध संघाकडून शेतकऱ्यांना १ रुपयाचा दूधदर फरक; वार्षिक उलाढाल ३८७ कोटीवर

SCROLL FOR NEXT